Thursday, August 15, 2019

                             विभागीय माहिती कार्यालयात
स्वातंत्र्य दिनानिमीत्त ध्वजवंदन
            
 औरंगाबाद, दि. 15-  भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्यानंतर देशाने केलेली प्रगती ही अभिमानास्पद बाब असून या प्रगतीच्या वाटेवर वंचित घटकांना सहभागी करुन घेत स्वतंत्र भारताच्या विकासाला आपण सर्व मिळून व्यापक करण्याचा संकल्प करुया असे आवाहन मराठवाडा विभागाचे संचालक (माहिती) यशवंत भंडारे यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय आणि माहिती केंद्र, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी श्री.भंडारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
            भारतीय राज्य घटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समानता, न्याय, बंधुता याचा समान अधिकार दिला. ज्याद्वारे विविध जातीधर्म, पंथाचे विभिन्न भागातील लोक प्रगतीच्या दिशेने पुढे जात आहेत. याच पध्दतीने प्रत्येक घटकांच्या परस्पर सहकार्याने देशाच्या प्रगतीसाठी आपण भरीव योगदान देण्याच्या वृत्तीने कार्यरत होऊ या, असे आवाहन यावेळी श्री. भंडारे यांनी केले.
तत्पूर्वी सर्वांनी राष्ट्रीय ध्वजास सलामी देऊन राष्ट्रगीत म्हटले. यावेळी अमरावती विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक राधाकृष्ण मुळी, सहायक संचालक प्रमोद धोंगडे, माहिती सहाय्य्क श्याम टरके, रेखा पालवे आदींसह संचालक कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, माहिती केंद्रातील कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्यने उपस्थिती होती.
**********
 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   402   लातूर लोकसभेसाठी ड्युटी लागलेल्या कर्मचाऱ्यांसाठी 5 मे रोजीची बस व्यवस्था    88-लोहा विधानसभा क्षेत्रासाठी सुविधा उपलब्...