Wednesday, July 31, 2019


जिल्ह्यातील आर्थिक गणना होणार पेपरलेस
माहिती अचूक होण्यासाठी
नागरिकांनी सहकार्य करावे
-         जिल्हाधिकारी अरुण डोंगरे 
नांदेड दि. 31 :- केंद्र शासनाकडून राष्ट्रव्यापी सातवी आर्थिक गणना जिल्ह्यात येत्या ऑगस्ट पासून घेण्यात येणार असून या गणनेच्या माध्यमातून संकलत होणारी माहिती अचूक होण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी प्रगणकांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
या गणनेच्या माध्यमातून संकलत होणारी माहिती अचूक होण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षात आज घेण्यात आली. 
या बैठकीस जिल्हयातील प्रमुख अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, उपायुक्त (प्रशासन) महानगरपालिका, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, राष्ट्रीय नमुना पाहणी कार्यालयाचे वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी तसेच जिल्हातील सर्व नगरपालिका / नगरपंचायतचे मुख्याधिकारी कॉमन सर्विस सेंटरचे (CSC) अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले, आर्थिक गणनेच्या माहितीचा केंद्र राज्य शासनास नियोजन तसेच धोरण आखण्यासाठी उपयोग होतो. जिल्ह्यातील सर्व शहर गावात गणनेचे काम प्रभावीपणे होण्यासाठी संबंधीत अधिकाऱ्यांनी गणना कामी नेमणूक केलेल्या प्रगणक पर्यवेक्षकांना सर्वोतोपरी सहकार्य करावे. या गणनेविषयी जनतेमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करुन याकामी येणाऱ्या अडचणी सोडवण्याचे निर्देश यावेळी दिले.
प्रास्ताविकात आर्थिक गणनेबाबत माहिती देताना जिल्हा सांख्यिकी अधिकारी निखिल बासटवार म्हणाले, ही गणना प्रथमच मोबाईल पव्दारे होणार असून गणना पेपरलेस होणार आहे. यामध्ये व्यवसाय, द्यो, वस्तु सेवा वितरणामध्ये सहभागी आस्थापना, रोजगार, कामगारांची संख्या, स्वयंरोजगार, कामगार पणन संस्था इ. घटकांची गणना केली जाणार आहे.
आर्थिक गणनेचे क्षेत्रकाम कॉमन सर्विस सेंटरचे (CSC) ई-गव्हर्नन्स यांचेकडून नेमण्यात आलेल्या 1 हजार 180 प्रगणक 897 पर्यवेक्षककडून केले जाणार आहे. नियुक्त प्रगणक प्रत्यक्ष घरोघरी भेट देवून कुंटुंबाची माहिती संकलित करणार आहेत. तसेच प्रगणकांनी केलेल्या कामाचे तपासणी पर्यवेक्षक करतील. हे काम ऑगस्ट 2019 मध्ये सुरू होणार आहे, अशी माहिती यावेळी जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्री. बासटवार यांनी दिली.   
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   394 राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई   ·    ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन     नांदेड (जिमाका) दि. 2 9 :-   राष्...