Monday, July 15, 2019

छायाचित्र मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर ; अर्ज व ऑनलाईन नोंदणीची 30 जुलै मुदत



       नांदेड, दि. 15  :- मा. भारत निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूका विचारात घेऊन दिनांक 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत महाराष्ट्र राज्यातील  सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदारयाद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.
       मतदार यादीत नाव समाविष्‍ट नसल्‍यास दिनांक 15 जुलै, 2019 ते 30 जुलै 2019 या कालावधीत आपले अर्ज संबंधित बीएलओ, तहसिल कार्यालय अथवा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात जमा करावेत. तसेच मतदारांच्या सुलभतेसाठी www.nvsp.in या संकेतस्थाळावर ऑनलाईन नाव नोंदणीची, यादीतील तपशिलात बदल करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
            या कार्यक्रमांतर्गत मतदार म्‍हणून नोंदणी झालेली नाही अशा पात्र मतदारांची  नाव नोंदणी मतदार यादीत  करण्‍यासाठी आणखी  संधी मिळावी व त्‍यांची नावे मतदार यादीत समाविष्‍ट व्‍हावीत याकरीता हा कार्यक्रम राबविण्‍यात येत आहे.
मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
पुनरीक्षण कार्यक्रमाचे विवरण
कालावधी
प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी
दिनांक 15 जुलै 2019 ( सोमवार )
दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी
दिनांक 15 जुलै 2019 ( सोमवार ) ते दिनांक 30 जुलै 2019 (मंगळवार)
विशेष मोहिमेचे दिनांक
दिनांक 20 (शनिवार) व 21(रविवार) जुलै 2019  
दिनांक 27 (शनिवार) व 28(रविवार) जुलै 2019
दावे व हरकती निकाली काढणे
दिनांक 13 ऑगष्‍ट (मंगळवार)2019 पर्यंत
डाटाबेसचे अद्यावतीकरण आणि पुरवणी यादीची छपाई
दिनांक 16 ऑगष्‍ट (शुक्रवार) 2019 पर्यंत
अंतिम मतदार यादी प्रसिद्धी
दिनांक 19 ऑगष्‍ट 2019 ( सोमवार )
          या कार्यक्रमाचे वेळापत्रकानूसार आज दिनांक 15 जुलै 2019 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे. या मतदार यादीमध्‍ये ज्‍या मतदाराची नावे समाविष्‍ट नाहीत अशा मतदारांना नमुना -६ मध्‍ये अर्ज सादर  करून त्‍यांची नावे मतदार यादीत समाविष्‍ट  करता येतील. तसेच अनिवासी भारतीय नागरिकांना नमुना-6 अ मध्‍ये अर्ज करुन मतदार यादीत नाव समाविष्‍ट  करता येईल. मतदार यादीत समाविष्‍ट असलेल्‍या नोंदीबाबत आक्षेप असल्‍यास सदर नोंद वगळण्‍यासाठी नमुना -7 मध्‍ये अर्ज सादर करता येतील. तसेच मतदार यादीत असलेल्‍या नोंदीबाबत दुरूस्‍ती करावयाची असल्‍यास नमुना -८ मध्‍ये आणि एका भागातून दुसऱ्या  यादी भागात नोंद स्‍थलांतरीत करावयाची असल्‍यास विहीत नमुना -८ अ मध्‍ये अर्ज सादर करता येतील.
        आगामी सार्वत्रिक  विधानसभा निवडणूक 2019 च्‍या अनुषंगाने प्रत्‍येक मतदाराने आपले नाव प्रारूप मतदार यादीत समाविष्‍ट असल्‍याची खात्री करून घ्‍यावी, मतदार यादीत नाव समाविष्‍ट नसल्‍यास दिनांक 15 जुलै, 2019 ते 30 जुलै 2019 या कालावधीत आपले अर्ज संबंधित बीएलओ, तहसिल कार्यालय अथवा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात जमा करावेत. तसेच मतदारांच्या सुलभतेसाठी www.nvsp.in या संकेतस्थाळावर ऑनलाईन नाव नोंदणीची, यादीतील तपशिलात बदल करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. असे आवाहन मा. जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   407 लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  नांदेड दि. ४ मे :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 प्र...