Wednesday, June 26, 2019

होमगार्डच्या 183 पुरुष, 179 महिला पदांसाठी मोफत नाव नोंदणी 15 जुलै पासून होणार



नांदेड, दि. 26 :- जिल्ह्यातील नांदेड, बिलोली, हदगाव, मुखेड, देगलूर, कंधार, किनवट व भोकर पथकातील 183 पुरुष व 179 महिला होमगार्ड पदांच्या जागांसाठी नाव नोंदणी 15 जुलै ते 17 जुलै 2019 या कालावधीत पोलीस मुख्यालय कवायत मैदान नांदेड येथे मोफत करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी केले आहे.
नांदेड पथकात- 100 पुरुष व 55 महिला, बिलोली- 17 पुरुष व 27 महिला, हदगाव- 16  पुरुष 26 महिला, मुखेड- 4 पुरुष 14 महिला, देगलूर- 8 पुरुष 7 महिला, कंधार- 23 पुरुष 24 महिला, किनवट- 5 पुरुष, 14 महिला, भोकर- 10 पुरुष 12 महिला या होमगार्डच्या रिक्त पदांसाठी ही नाव नोंदणी करण्यात येणार आहे.
उमेदवारांसाठी वयोमर्यादा 20 ते 50 वर्षे असून किमान दहावी उत्तीर्ण असावा. पुरुष उमेदवारासांठी उंची 162 सें.मी किमान, छाती न फुगवता 76 सेंमी, आणि फुगवून 81 सेमी असवी. 1 हजार 600 मीटर धावणे व गोळाफेक या मैदानी चाचणी अनिवार्य असून उमेदवार सुशिक्षित बेरोजगार नसावा.
महिला उमेदवारांसाठी उंची किमान 150 सेमी असावी. आठशे मीटर धावणे व गोळाफेक ही मैदानी चाचणी घेण्यात येईल. उमेदवारास या चाचणीमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक प्रकारात कमीतकमी 40 टक्के गुण आवश्यक राहतील. या व्यतीरिक्त आटीआय प्रमाणपत्र, खेळाचे कमीतकमी जिल्हास्तरीय प्रमाणपत्र, माजी सैनिक प्रमाणपत्र, एनसीसीबी किंवा सी प्रमाणपत्र, नागरीसंरक्षण सेवेत असल्याचे प्रमाणपत्र, जडवाहन चालविण्याचा परवाना या प्रमाणपत्रधारकांना तांत्रीक अर्हता गुण दिल्या जातील.
पोलीस मुख्यालय कवायत मैदान वजिराबाद नांदेड येथे सोमवार 15 जुलै 2019 रोजी सकाळी 8 वाजेपासून नाव नोंदणी करण्यात येईल. सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीत कागदपत्रांची तपासणी व शारिरीक चाचणी घेण्यात येईल. नाव नोंदणीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असल्याचे मुळ प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे तीन कलर फोटो, रहिवाशी असल्याचा सक्षम पुरावा, इतर शैक्षणिक कागदपत्रे झेरॉक्स प्रतीसह सोबत आणावीत. शारिरीक चाचणीत पात्र ठरलेल्या पुरुष / महिला उमेदवारांची मैदानी चाचणी मंगळवार 16 जुलै 2019 रोजी सकाळी 5 वा. शहीद भगतसिंघ चौक असर्जन नाका विष्णुपुरी रोड नांदेड येथे घेण्यात येईल.
होमगार्ड ही स्वयंसेवी संघटना आहे. होमगार्ड स्वयंसेवकांना कुठलाही नियमीत पगार किंवा मानधन दिल्या जात नाही. प्रशिक्षीत होमगार्डना कर्तव्यावर नेमण्यात येते तेव्हा त्यांना 570 रुपये कर्तव्य व 100 रुपये उपहार भत्ता तसेच कवयातीला उपस्थित राहिल्यास 90 रुपये भत्ता दिला जातो. नाव नोंदणीसाठी आलेल्या कोणत्याही उमेदवाराला कुठलाही प्रवास भत्ता दिला जाणार नाही. शारिरीक किंवा मैदानी चाचणीच्यावेळी कोणताही अपघात घडल्यास किंवा शारिरीक दुखापत घडल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी ही संबंधीत उमेदवारांची राहील.
काही तांत्रिक अथवा अपरिहार्य कारणास्तव नाव नोंदणी प्रक्रिया रद्द करण्याचा अधिकार जिल्हा समादेशक यांना राहील. नाव नोंदणीसाठी पैशाची मागणी केल्यास लाचलूचपत प्रतिबंधक शाखा नांदेड यांचेकडे 02462-253312 या दुरध्वनीवर किंवा अपर पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड 02462-232961 किंवा जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय नांदेड 02462-254261 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा‍, असे आवाहन जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   407 लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  नांदेड दि. ४ मे :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 प्र...