Friday, May 31, 2019

जिल्हा रुग्णालयात जागतिक तंबाखू नकार दिन साजरा
नांदेड दि. 31 :- जागत्तिक तंबाखू नकार दिनानिमित्त आज श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.पी.कदम व अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. 
या दिनाचे औचित्य साधून ३१ मे ते ३० जून पर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालय व जिल्हा रुग्णालय या मध्ये ३० वर्षावरील सर्वांचे मौखिक तपासणी करण्यात येणार असून सदर तपासणी मोहिमेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कदम यांनी केले आहे.
यावेळी अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांनी बाह्यरुग्ण विभागात उपस्थित रुग्ण व नातेवाईक यांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत मार्गदर्शन केले तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. दिपक हजारी तथा अन्न सुरक्षा अधिकारी श्री कावळे यांनी उपस्थितांना कोटपा कायदा २००३ बाबत माहिती दिली.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.साईप्रसाद शिंदे यांनी केले, डॉ.सौ.अर्चना तिवारी यांना उपस्थितांना तंबाखूमुक्तीसाठी शपथ दिली. तसेच जिल्हा रुग्णालयातील डॉ.हनमंत पाटील, डॉ.दीपक गोरे व सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी गायकवाड परिश्रम घेतले. 
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   405   नांदेड जिल्ह्यात ड्रोन उडविण्यास प्रतिबंध नांदेड दि. 3     - नांदेड जिल्ह्यात   4   ते   7   मे 2024   या कालावधीत ड्रो...