Thursday, April 4, 2019


एमसीएमसी समितीच्‍या मिडिया कक्षाला
निवडणूक निरीक्षक विरेंद्र सिंग यांची भेट
नांदेड,दि 3 :-  माध्‍यम प्रमाणीकरण व देखरेख समिती अर्थात मिडिया कक्षाला निवडणूक निरीक्षक (खर्च) विरेंद्र सिंग यांनी भेट दिली.
या भेटी दरम्‍यान मिडिया कक्षातील माध्‍यम प्रमाणीकरणासाठी लावण्‍यात आलेल्‍या विविध वाहिन्‍यां तसेच स्‍थानिक केबल वाहिन्‍यांच्‍या देखरेखीसाठी लावण्‍यात आलेल्‍या टीव्‍ही संचाची त्‍यांनी पाहणी केली. कक्षात दररोज येणा-या विविध वृत्‍तपत्रातील बातम्‍यांच्‍या कात्रणाच्‍या संचाची यावेळी पाहणी करण्‍यात आली. पेडन्‍युज प्रकरणी समितीने केलेल्‍या कार्यवाहीविषयी त्‍यांनी आढावा घेतला.
 तसेच उमेदवारांच्‍या जाहिरातीवर होणारा खर्च, सोशल मिडियावरुन प्रसारित होणा-या जाहिरात निर्मिती आणि प्रसारणाचा खर्च एमसीएमसी समितीने प्रमाणीत करुन दिलेल्‍या खर्चाची आढावा घेतला. या समितीने प्रमाणीत करुन दिलेल्‍या जाहिरातीच्‍या संचाची पाहणी केली.
 यावेळी मिडिया कक्षाचे प्रमुख जिल्‍हा प्रशासन अधिकारी राजेंद्र चव्‍हाण, निळकंठ पांचगे, जिल्‍हा कोषागार अधिकारी श्री. गग्‍गड, माहिती अधिकारी तथा सदस्‍य सचिव श्रीमती मीरा ढास, प्रा. डॉ. दीपक शिंदे, जनसंपर्क अधिकारी मिलींद व्‍यवहारे आदिंची यावेळी उपस्थिती होती.
००००

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   405   नांदेड जिल्ह्यात ड्रोन उडविण्यास प्रतिबंध नांदेड दि. 3     - नांदेड जिल्ह्यात   4   ते   7   मे 2024   या कालावधीत ड्रो...