Sunday, March 31, 2019


वृत्त क्र. 253
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक
18 एप्रिलला मतदानाच्या दिवशी
भरणारे आठवडी बाजार बंद राहणार
नांदेड, दि. 31 :-  लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी गुरुवार 18 एप्रिल 2019 रोजी जिल्ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश मार्केट ॲड फेअर ॲक्ट 1862 चे कलम 5 अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हदंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी निर्गमीत केले आहेत.   
जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी नांदेड, हिंगोली व लातूर या लोकसभा मतदारसंघातील किनवट, हदगाव, भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, लोहा, नायगाव, देगलूर व मुखेड या नऊ विधानसभा मतदारसंघात गुरुवार 18 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी मतदान दिनांकास जिल्ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्यास परवानगी दिली आहे.  
गुरुवार 18 एप्रिल 2019 रोजी आठवडी बाजार भरणाऱ्या गावांची ठिकाणाची नावे पुढील प्रमाणे आहेत. अर्धापूर तालुका – मालेगाव, नायगाव खै.- नायगाव (बा.), भोकर, हदगाव- वाळकी खु, ल्याहारी (वाळकी फाटा), तळणी. किनवट- उमरी बा., बेल्लोरी (धा.). देगलूर- लोणी, बिलोली, मुखेड- बेटमोगरा, राजुरा बु, नांदेड- सिडको, कंधार- कुरुळा, मंगलसांगवी या ठिकाणची आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार 19 एप्रिल 2019 रोजी भरविण्यात यावेत, असे आदेशात म्हटले आहे.
0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   405   नांदेड जिल्ह्यात ड्रोन उडविण्यास प्रतिबंध नांदेड दि. 3     - नांदेड जिल्ह्यात   4   ते   7   मे 2024   या कालावधीत ड्रो...