Saturday, February 2, 2019


रस्ता सुरक्षा अभियानाचा आज शुभारंभ
4 ते 18 फेब्रुवारी कालावधीत अभियान  
नांदेड दि. 3 :- परिवहन विभाग व पोलीस विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान 4 ते 18 फेब्रुवारी कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अभियानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते सोमवार 4 फेब्रुवारी रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय एमआयडीसी सिडको नांदेड येथे सकाळी 11.30 वा. होणार आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्त लहुराज माळी, पोलीस अधीक्षक संजय जाधव, प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे.  
दैनंदिन जीवनात होत असलेल्या अपघातामुळे दररोज मोठी जीवित व वित्तहानी होत आहे. वाहन अपघातास परिणामकारकरित्या आळा बसावा व नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने दरवर्षी देशात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते. सडक सुरक्षा-जीवन रक्षा रस्ता सुरक्षा अभियान-2019 उद्घाटन समारंभास वाहनधारक, नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत व वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी केले आहे.  
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.  432   नविन   पाच   इंटरसेप्टर वाहनांद्वारे   रस्ता सुरक्षा  विषयी  प्रबोधन   ·       रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी होणार मद...