Saturday, January 19, 2019

प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, मावाचा
3 लाख 63 हजार रुपयाचा साठा नष्ट
नांदेड दि. 19 :- प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, मावा आदी तत्सम पदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत नुकतेच उमरी येथे न्यायालयात दाखल खटल्यातील 3 लाख 63 हजार 560 रुपयाचा प्रतिबंधित साठा जाळून नष्ट करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीविरुद्ध न्यायालयात खटला दाखल असून गुन्हा सिद्ध झाल्यास 6 वर्षापर्यंत कारावास व 5 लाख रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत आहे. 
गुटखा, पानमसाला, मावा आदी तंबाखुजन्य पदार्थांच्या सेवनाने तोंडाचा कर्करोग, पोटाचा आजार, अन्ननलिकेचा कर्करोग, श्वसनाचे आजार, ऱ्हदयविकार यासंबंधीचे आजार होतात. सार्वजनिक आरोग्याच्या हेतूने राज्यात उत्पादन, वाहतूक, साठा, वितरण, विक्री यावर बंदी घालण्यात आलेला गुटखा, पानमसाला, मावा, सुगंधित तंबाखु व तत्सम पदार्थ याचा कुठलाही व्यवहार करु नये. समाजाच्या चांगल्या स्वास्थासाठी अन्न व्यावसायिक, विक्रेते, वाहतुक करणारे व्यावसायिक, वाहनधारक, पानपट्टी चालकांनी  हातभार लावावा, असे आवाहन नांदेडचे अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...