Saturday, December 8, 2018


नांदेड ग्रंथोत्सवाची सुरुवात ग्रंथ दिंडीने उत्साहात  

नांदेड, दि. 8 :- महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालय नांदेड जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयच्यावतीने येथील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह शेजारी आयोजित "नांदेड ग्रंथोत्सव 2018" हा दिनांक 8 व 9 डिसेंबर,  2018 दोन दिवस आयोजित करण्यात आला आहे. याची सकाळी ग्रंथदिंडीने सुरुवात करण्यात आली. ही ग्रंथदिंडी महात्मा फुले पुतळा आयटीआयपासून कुसूम सभागृह मार्गे जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्या आवारात पोहचली. ग्रंथदिंडीची सुरुवात जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते पुजनाने झाली.
यावेळी सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, डॉ. जगदीश कुलकर्णी, डॉ. हंबर्डे, प्रताप सुर्यवंशी, संजय कर्वे, संजय पाटील, निर्मलकुमार सुर्यवंशी, माजी आमदार गंगाधरराव पटणे, संजय पोतदार व जिल्ह्यातील वाचनालयाचे सर्व कर्मचारी आणि ग्रंथप्रेमींची यावेळी उपस्थिती होती.
नांदेड ग्रंथोत्सव -2018 या ग्रंथदिंडीमध्ये मधुबन महाराज हायस्कूल (धनेगाव), शारदा भवन हायस्कूल (नांदेड), विमलेश्वर वारकरी शिक्षण संस्था (मरळक), वारकरी सांप्रदाय भजणी मंडळ (हाळदा), बंजारा महिला नृत्य (वर्ताळा तांडा ता. मुखेड), तसेच शाहीर जाधव व त्यांचा चमू (सुजलेगाव ता. नायगाव) इत्यादींनी सहभाग घेतला होता. वाजत-गाजत निघालेल्या दिंडीत अनेक साहित्यिक, ग्रंथप्रमी आणि ग्रंथ चळवळीतले मान्यवर सहभागी झाले होते. या दिंडीमुळे साहित्यमय वातावरण तयार झाले होते.
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   407 लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  नांदेड दि. ४ मे :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 प्र...