Monday, October 1, 2018


लेख
चला करु या कुष्ठरोगमुक्त महाराष्ट्र...  
आता वाटचाल कुष्ठरोगमुक्त महाराष्ट्राकडे

दरवर्षी आपण सर्व  2 ऑक्टोंबर हा दिवस परम पूज्य महात्मा गांधी यांची जयंती म्हणून  साजरा करतो  कुष्ठरुग्णांची सेवा हे  परम पूज्य  महात्मा गांधी यांचे अपूर्ण राहिले काम आहे.
        कुष्ठरोग हा अति प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेला रोग आहे या रोगाची माहिती अनेक पाठ्यपुस्तकातून आपणास मिळते.  फार पूर्वी या रोगास महारोग म्हणत होते व हाच शब्द पुढे असाच प्रचलित झाला आहे. या रोगाची विद्रुपता पाहूनच या रुग्णाला समाजाने  महारोगी असे नाव दिले व ते नाव आजही प्रचलित आहे. कुष्ठरोग झालेल्या रुग्णास फार वर्षापूर्वी वाळीत टाकले जायचं त्याला हीन दर्जाची वागणूक दिली जायची. यामुळे रुग्णास उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध रहात नव्हते. यामुळे नाईलाजाने तो कुष्ठरुग्ण दारोदारी भिक मागत असे. या रुग्णांकडे सर्वप्रथम कोणी पहिले असेल तर ते ख्रिशनमिशनऱ्यांनी. भारतात यांनीच या रुग्णांसाठी मोठी मोठी दवाखाने उभारली व याची सेवा ते करू लागले.
       भारतात डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन, विनोबा भावे,व महात्मा गांधीजी यांनी या रुग्णांची सेवा केली व अलीकडील काळात बाबा आमटे यांना आपण कधीही विसरणार नाही कारण त्यांनी कुष्ठरुग्णांसाठी खूप कार्य केले आहे .
     सन १८७३ मध्ये या कुष्ठजंतूचा शोध डॉ आरमार हन्सन या नॉर्वे देशाच्या शात्रज्ञाने लावला वं याला मायाकोबाक्टेरीम लेप्री हे नाव दिले .कुष्ठरोग हा रोग याच जिवाणूमुळे होतो .हा जीवाणू फ़क़्त माणसाच्या शरीरातच राहतो व हा रोग मानवापासून मानवास होतो. हा अल्पसासंर्गीक असून आज मितीला यावर प्रतिबंधात्मक लस तयार झाली आहे पण ती अद्याप प्रयोग अवस्थेत आहे मात्र याचा नायनाट करता येईल अशी खात्री जागतिक आरोग्य संघटनेला आली आहे. गदी लवकरात लवकर रोगाचे निदान करून औषधोपचाराखली  आणल्यास कुष्ठरोग पुर्णपणे बरा  होतो या रोगाचे जंतु मानवी शरीरात प्रवेश करतात तेव्हा त्याचा पेशीजालाशी संघर्ष होतो यात जंतु व पेशीजाल याचा नाश होतो या प्रकाराला असांसेर्गिक रोग असे महणतात, दुसर्‍या प्रकारात मात्र जंतूची वाढ ही अमर्याद असते यात रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती कमी असते महणून रोगाची वाढ लवकर होते. प्राथमिक अवस्थेत पेशीजाल फारसे  होत नाही मात्र विकोपाला गेल्यावर ढोबळ चिन्हे मात्र दिसू लागतात.सततच्या घनिष्ठ संपर्काने एकमेकांपासून दुसऱ्यास होतो . यात सुरुवातीची लक्षणे व नंतरची लक्षणे ही प्रगत असलेली असतात व हीच लक्षणे समाजासमोर येतात. यासाठी या रोगाची भीती व तिरस्कार अनेक शतके घट्ट गैरसमजुती समाजात निर्माण करत आहे .
       शरीराच्या कोणत्याही भागावर त्वचेच्या रंगपेक्षा वेगळ्या रंगाचा लालसर चट्टा व डाग  समोर येतो  कोडाप्रमाणे याचे डाग  पांढरे नसतात त्वचेवरील डाग समजण्यास वेळ लागतो मात्र महत्वाचीगोष्ट महणजे या जागची  त्वचा स्पर्शहीन होते ,उष्णता व वेदना पूर्ण पणे नाहीश्या  होतात तसेच हे जंतू खोलवर कार्य करतात त्यामुळे घाम येणाऱ्या ग्रंथी आणि चेतासंस्था या पूर्ण ताकदीनिशी काम करत नाहीत  भारतात बरीच रुग्ण हे असांसर्गिक असतात व काहीप्रमाणात रुग्ण हे सांसर्गिक असतात व हेच रुग्ण अंगावर चट्टे ,चेहेर्‍यावर व कानाच्या पाळीवर  गाठी येणे ,भुवयाचे केस जाने, हातापायची बोट वाकडी होणे क्षती पडणे, जखमा चिघळणे,कधी कधी डोळे,कान,नाक व घश्यामध्ये गाठी दिसू लागतात तसेच चेहऱ्यावरील गाठी मुळे चेहरा सिहासारखा दिसू लागतो ,कधी कधी नाकाच्या आकारात बदल होतो  अशी लक्षणे रुग्णाच्या शरीरावर दिसू लागतात
       १९४७ साली या रोगावर DAPSON नावाचे औषध निर्माण झाले या औषधाचा वापर सर्व जुन्या व नवीन कुष्ठरुग्णांना करण्यात येऊ लागला .या औषधाचा प्रभावामुळे सन १९५५ साली महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाची सुरुवात केली या काळात सर्व नवीन व जुन्या विकृती कुष्ठरुग्णांना  या औषधाखाली आणले या नंतर नवीन औषधाचा शोध चालू होता व याला सन १९८१-१९८२ साली १००% यश प्राप्त झाले या औषधाचे नाव MDT हे होय. कुष्ठरोगवर हे रामबाण औषध आहे व हि औषधी आजही चालू आहे. या औषधामुळे रोगाची तीव्रता कमी झाली आहे म्हणजेच पूर्वी (M.D.T.) येणायापुर्वी दर दहा हजारलोकसंख्या मध्ये १०० ते ११८ रुग्ण सापडत असे पण (M.D.T.) मुळे आज मितीला हे प्रमाण १ किवा १ पेक्षा कमी झाले आहे म्हणजेच  आपण या रोगाचे दूरीकरण केले आहे . या यशाचे भागीदार जनता जनार्धनच आहे.
     कुष्ठरोगाची लक्षणे – फिक्कट किवा लालसर उभारी आलेला बधीर चट्टा , जंतू परीक्षणात जंतू सापडणे ,चटयावरील केस हळूहळू नाहेसे होतात, त्वचा तेलकट व चकाकणारी असते, रुग्णाच्या नसा जंतूमुळे रोगग्रस्त होतात त्या मुळे त्या जाड व दुखऱ्या होतात.भूवायाची केस गळून पडतात,कानाच्या पाळ्या जाड होतात  वरील लक्षणे आपल्या शरीरावर आढल्यास लवकरात लवकर नजीकच्या सरकारी दवाखाण्यात दाखून घ्यावे.
     उद्देश --- १) लवकरात लवकर निवीन कुष्ठरुग्ण शोधून काढणे ,विनाविक्कृती रुग्ण शोधणे व त्याला M.D.T. औषधाखाली आणणे .२) नवीन सांसर्गिक रुग्ण सापडल्य्मुळे संसर्गाची साखळी खंडित होऊन रोगाचा प्रसार कमी करणे ३)कुष्ठरोगाचे दूरीकरण साध्य करणे ४) कुष्ठरोगाचे प्रमाण कमी असलेल्या जिल्ह्यामधील कुष्ठरोगाचे प्रमाणाची खात्री करणे.
     पध्दती- संपूर्ण जिल्हा स्तरावर अभियानाची सुरुवात , सर्व आरोग्य कर्मचारी यांचे प्रशिक्षण , आरोग्य शिक्षण कार्यक्रमाची सुरुवात यात वर्तमान पत्रात लेख म्हणी लिहणे , रेडीओ संदेश हस्तपत्रिका वाटप करणे ,शाळेत माहिती देणे ,प्रभातफेरी काढणे , दवंडी देणे ,  ग्रामसभेमध्ये माहिती देणे ,मंदिर मज्जित वरील स्पीकर्स वर माहिती देणे, विशेष मोहिमेत आरोग्य कर्मचारी यांचे मार्फत घरोघर सर्वेक्षण घेणे, एल. आर सी ( कुष्ठरोग संदभं सेवा केंद्र ) L.R.C. च्या माधमातून कुष्ठरोगबाधिताना दर्जेदार सेवा दिले जाते  तसेच इतर कुष्ठरोग आरोग्य साहित्याचा वापर करून निघालेले संशइत रुग्णांना वैद्यकीय आधिकारी  यांच्या मार्फत तपासणी करून त्यांना एम डी टी ( बहुविध औषधोपचार पद्धती ) देऊन रोगमुक्त करणे.
     कुष्ठरोगाचा प्रसार कसा होतो—उपचारघेतलेल्या सांसेर्गिक कुष्ठरुग्णाकडूनच केवळ हवेच्या माध्यमातूनच मानवास होतो
     अधिशयन काळ –याचा अधिशयन काळ हा ३ ते ५ वर्षाचा किवा या पेक्षा अधिकही असू शकतो
     कुष्ठरोग कोणाला होऊ शकतो किंवा नाही १) हा रोग कोणालाही होऊ शकतो २) कुष्ठरोग होणे किवा न होणे हे त्या मनुष्याच्या रोग प्रतिकार शक्तीवर अवलंबून असते. ३) हा रोग स्त्री / पुरुष ,जात / धर्म ,गरीब / श्रीमंत, उच्च / नीच असा भेदभाव करत नाही. ४) ९८ टक्के लोकांची रोगप्रतिकार शक्ती हि चांगलीच असते अशांनाच हा रोग होत नाही
     कुष्ठरोगाच्या लक्षनाची  ठळक वैशिट्ये -१) कुठलाही त्रास होत नाही ,खाजत  नाही ,दुखत नाही .२) शरीरावर कुठेही होऊ शकतो ,३)हा आजार हळुवारपने पसरणारा आहे ,४) याचे डाग दुधासारखे पांढरे नसतात ,५) याचे चट्टे कमीजास्त कमीजास्त होत  नाही  ,६) चटयावरील केस हळूहळू नाहीसे होतात ,७) चटयावर घाम येत नाही ई.
     थोडेसे महत्वाचे-  १) हा रोग जीवाणू मुळे होतो २) हा आजार अनुवांशिक नाही  ३) यात पाप-पुण्याचा कुठलाही संबध नाही  ४) हा आजार दैवीशापा- पापा मुळे होत नाही ५) देवाला नवस फेडल्याने हा आजार बरा होत नाही ६)  हा  आजार जडीबुटी मुळे बरा  होत नाही  ७) हा आजार पूजा अर्चा मुळे कमी होत नाही या आजारावर एकच आणि एकच औषध म्हणजे  M.D.T. असून हे सर्व सरकारी ,निमसरकारी दवाखान्यात मोफत मिळते
     कुष्ठरोग प्रकार – १) P.B ( असंर्गिक रुग्ण )- एक ते पाच बधीर चट्टे २) M.B ( अल्प सांसेर्गिक रुग्ण ) पाच पेक्षा जास्ती चट्टे ,एक किवा अनेक मज्जा बाधित होणे
     कुष्ठरोगावरील औषधी -१) एम डी टी ( बहुविध औषधोपचार पद्धती )-M.D.T असे म्हणतात .सदरील औषधी ही सरकारी,निमसरकारी दवाखान्यात मोफत मिळतात .या औषधाच्या एकाच मात्रेने ९९.९९ टक्के जंतू मारले जातात .म्हणूनच सांसेर्गिक रुग्णसुद्धा रोगप्रसार करू शकत नाहीत .२) कुठल्याही प्रकारचा कुष्ठरोग ६ ते १२ महिन्यात पूर्णपणे बेरा होतो ३) ) एम डी टी ( बहुविध औषधोपचार पद्धती )-M.D.Tहि सर्वांसाठी सुरक्षित आहे .  
       शासकीय योजना -  १) विकृती रुग्णांना संजय गांधी निराधार योजना / इंदिरा आवास योजना , बस पास , रेल्वे पास , बोटे वाकडी ( हालचाल करणारी) असतील तर अशा रुग्णांना पुनर्रचनातमक शस्त्रक्रिया  मोफत करून रुग्णाला ८००० /- दिले जातात तसेच अशा रुग्णाला SPLINT दिली जाते , तळपायाल बधिरता असलेल्या रुग्णाला M.C.R. चप्पल दिली जाते ,पायाला,हाताला जखमा असतील तर अशांना ULCER KIT दिली जाते , डोळे बंद न होणार्या रुग्णाला GOGGLE दिला जातो.
       तरी अपना सर्वाना विनंती करण्यात येते कि आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचारी  यांना घरातील सर्व सभासदांची तपासणी करून घेण्यास आपण सर्वांनी सहकार्य करावे  जेणे करून आपण संपूर्ण महाराष्ट्र    भारत कुष्ठरोग मुक्त करू. 
                                                                  सुनिल पाटील
                                                                अवेद्यकीय  सहायक
                                                                           सहायक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग
                                                                                                कार्यालय नांदेड

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   394 राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई   ·    ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन     नांदेड (जिमाका) दि. 2 9 :-   राष्...