Monday, October 29, 2018


नांदेड गुरुद्वारा मंडळाची निवडणूक
मतदार यादी 22 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार
नांदेड दि. 29 :- नांदेड शिख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्‍या तीन सदस्‍यांना निवडून देण्‍यासाठीची अंतिम मतदार यादी 3 नोव्हेंबर ऐवजी 22 नोव्हेंबर 2018 रोजी प्रसिध्‍द करण्‍यात येणार आहे. याची संबंधितांनी नोंद घ्‍यावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी नांदेड  यांनी केले आहे.  
महसूल वन विभागाची अधिसूचना 27 जून 2018 नुसार नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्‍या तीन सदस्‍यांना निवडुन देण्‍यासाठी मतदार क्षेत्र औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्‍मानाबाद, नांदेड, बीड, लातूर हे संपुर्ण जिल्‍हे चंद्रपुर जिल्‍ह्यातील राजूरा, कोरपना जीवती हे तालुके (तत्‍कालीन हैद्राबाद निजाम संस्‍थानाचा महाराष्‍ट्रातील भाग) येथील महाराष्‍ट्र विधानसभेसाठी दि. 1 जुलै 2018 या अर्हता दिनांकास अस्तित्‍वात असलेली विधानसभा मतदार यादीतील समाविष्‍ट शिखधर्मीय मतदारांची यादी तयार करुन निवडणूक घेण्‍यासाठी  निर्देश देण्‍यात आले आहेत.
त्‍यानुसार अंतिम मतदार यादी 3 नोव्‍हेंबर 2018 रोजी प्रसिध्‍द करण्‍यात येणार होती. परंतू 6 ते 13 नोव्हेंबर 2018 या कालावधीतील शिख धर्मीयांचा 310 वा गुरु-ता-गद्दी समारोह 2018 हा कार्यक्रम संभाव्‍य निवडणूक कार्यक्रमाच्‍या कालावधीत येणार आहे. गुरु-ता-गद्दीच्‍या धार्मिक समारोहाच्‍या व्‍यस्‍त कार्यक्रमामुळे शिख बांधवांना निवडणूक कार्यक्रमामध्‍ये सहभागी होण्‍यास अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच या कालावधीत निवडणूक कार्यक्रमाची पुरेशी प्रसिध्‍दी होणार नाही.
याबाबत शुध्‍दीपत्रक औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्‍मानाबाद, नांदेड, बीड, लातूर चंद्रपुर जिल्‍ह्यातील दैनिक वर्तमानपत्रात प्रसिध्‍द होणार आहे. हे शुध्‍दीपत्रक मतदार क्षेत्रातील सर्व जिल्‍हाधिकारी कार्यालये गुरुव्‍दारा तख्‍त सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब बोर्ड नांदेडच्‍या सुचना फलकावर प्रसिध्‍द करण्‍यात आले आहे. तसेच नांदेड जिल्‍ह्याचे संकेतस्‍थळ (वेबसाईट)  www.nanded.gov.in वर देखील पाहण्‍यासाठी उपलब्‍ध आहे. असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000


No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...