Monday, September 17, 2018

















लोकराज्य प्रदर्शनाला राज्यमंत्री केसरकर यांची भेट
नांदेड दि. 17 :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने लोकराज्य मासिकाच्या गेल्या चार वर्षातील अंकांचे प्रदर्शन व विक्री स्टॉल माता गुजरीजी विसावा उद्यानात मांडण्यात आला. या लोकराज्य प्रदर्शन स्टॉलला राज्याचे गृह (ग्रामिण), वित्त व नियोजन राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी भेट देऊन लोकराज्य वाचक अभियानास शुभेच्छा दिल्या. 
लोकराज्य अंक  प्रदर्शनास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार, स्वातंत्र्य सैनिक नारायणराव भोगावकर, पुंजाजी कदम, महापौर शिलाताई भवरे, आमदार सर्वश्री अमर राजुरकर, राम पाटील रातोळीकर, डी. पी. सावंत, हेमंत पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मनपा आयुक्त लहुराज माळी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, गृहरक्षक दलाचे जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी, पदाधिकारी, अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांनी भेट देवून लोकराज्य ऐतिहासिक दस्तावेजाचे अवलोकन केले.
यावेळी माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे, सदाशिवराव पाटील, रामराव थडके, मयुरा मुंढे, महशे शुक्ला, प्रा. डॉ. लक्ष्मण शिंदे, कॉमरेड के. के. जामकर यांच्यासह अनेकांनी लोकराज्य वर्गणीदार म्हणून नोंदणी केली. लोकराज्य अंकाविषयी छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी मान्यवरांना माहिती दिली. जिल्हा माहिती कार्यालयातील विवेक डावरे, काशिनाथ आरेवार, महमंद युसूफ, अंगली बालनरस्या यांची यावेळी उपस्थिती होती.
याठिकाणी लोकराज्य अंकांच्या प्रतीची विक्री आणि वार्षिक वर्गणीदार म्हणून नोंदणी करण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी मान्यवरांना लोकराज्य अंक भेट देण्यात आला.  यात अनेक संग्राह्य अशा दुर्मिळ अंकाचा समावेश होता.

0000000
.




















No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   401 लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान   10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार   नांदेड दि. 2 ...