Wednesday, September 5, 2018


योजनांच्या माहितीसाठी लोकराज्य अंक उपयुक्त
- अनिल आलूरकर
नांदेड, दि. 5 :- शासनाच्या विविध योजनांच्या अधिकृत माहितीसाठी लोकराज्य अंक उपयुक्त असून वाचकांपर्यंत लोकराज्य अंक पोहचविण्यासाठी बचतगटांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हा माहिती कार्यालय नांदेड  विद्यमाने महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय नांदेड येथे  आयोजित लोकराज्य वाचक अभियान कार्यक्रमात श्री. आलुरकर बोलत होते.
यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाचे व्यवस्थापक चंदनसिंग राठोड, जिल्ह्यातील सर्व सीएमआरसीचे मॅनेजर तसेच विविध तालुक्यातील बचत गटांचे अध्यक्ष तसेच सदस्यांची उपस्थिती होती. 
श्री. आलुरकर म्हणाले, बचत गटातील महिलांनी लघुउद्योग उभारणीत पुढाकार घ्यावा. यासाठी आत्मविश्वास असेल तर कोणतेही ध्येय गाठता येते. बचतगटामार्फत लोकराज्य अंकाची मागणी करुन नागरिकांपर्यंत अंक पोहचती केल्यास बचतगटाला आर्थिक लाभ  मिळू शकेल. बचतगटाच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांनी स्वावलंबी होऊन उद्योगक्षेत्रात यावे यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रारंभी माविमचे व्यवस्थापक राठोड यांनी स्वागत करून माविमच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी किनवट येथील विशाल स्त्रोते यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील विवेक डावरे, अलका पाटील यांची उपस्थिती होती. 
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   405   नांदेड जिल्ह्यात ड्रोन उडविण्यास प्रतिबंध नांदेड दि. 3     - नांदेड जिल्ह्यात   4   ते   7   मे 2024   या कालावधीत ड्रो...