Monday, August 6, 2018


प्रामाणिक प्रयत्नातून "उज्ज्वल नांदेड"चे
विद्यार्थी यशस्वी - जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड दि. 6 :- स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी, सचोटी प्रामाणिक प्रयत्न केल्यामुळे "उज्ज्वल नांदेड"च्या विद्यार्थ्यानी यश मिळविले असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू समिती, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हयातील 30 पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या विद्यार्थ्याचा त्यांच्या पालकांचा जिल्हा प्रशासनाच्यावतीने नागरी सत्कार कार्याक्रमात अध्यक्षस्थानावरुन श्री. डोंगरे बोलत होते.
           
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात, सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, प्रतिरुप मुलाखत घेतलेले विषयतज्ज्ञ पुणे येथील प्रा. मनोहर भोळे, बालाजी चंदेल (API), श्री. मस्के (DSLR,पुसद), राहुल जाधव (RTO), सहाय्यक कोषागार अधिकारी विशाल हिवरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 
एमपीएससी परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांचा सत्कार करणे हे जिल्हा प्रशासनाची नैतिक जबाबदारी असल्याचे मत जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी व्यक्त केले. 
प्रा. भोळे म्हणाले नांदेड जिल्हा प्रशासन यंत्राणा एमपीएससीचा भ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याच्या मागे भक्कमपणे उभे आहे. विद्यार्थ्यांनी गटचर्चा करुन अभ्यास करावा. जिल्हयातून जास्तीतजास्त वर्ग-एक वर्ग-दोन अधिकारी झाले पाहिजेत, आशा अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी सहाय्य ग्रंथालय संचालक श्री. हुसे यशस्वी विद्यार्थी धनंजय गायकवाड, सुदर्शन इंगोले कु शिवनंदा जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. ढोक यांनी "ज्ज्वल नांदेड" मोहिमेतील आयोजित स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबिराची माहिती दिली. कार्यक्रमाची सुरुवात मीना सोलापुरे यांच्या प्रेरणा गीताने झाली.
या सत्कारात अमोल हनंवते (मुख्याधिकारी पदावर निवड), पोलिस उपनिरीक्षक पदास निवड झालेले धनंजय गायकवाड, सुदर्शन इंगोले कु शिवनंदा जाधव, छाया गादिलवाड, साखरे प्रदिप, लक्षमण अकमवाड, लोखंडे शिवराज, राहुल हंकारे, चिरंजीव दलालवाड, अजय पाटिल, अक्षय पाटील, अजय किरकन, मारोती नंदे, आकाश माकणे, खंडू दर्शने, माधवराव लोणेकर, शितल लोमटे, भाग्यश्री कांबळे, मनीषा गिरी, श्रीनिवास पडलवाड, अंजली काळे, कसवबेवाड साहेबराव, संदिप माचनवाड, विकास सुकलवाड, आकाश सरोदे, शंकर मोरे, अभय माकणे यांचा तर कु. आरती कोकुलवार यांनी नुकतीच ग्रंथालय माहिती विषयात नेट परीक्षा उत्तीर्ण तसेच ज्ञानेश्वर सर्जे यांची एनव्हीएसमध्ये शिक्षक पदास निवड तर  अमोल भंडारे यांची नांदेड जिल्हा पोलीसमध्ये निवड झाल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी मोठया प्रमाणावर गर्दी केली होती. सूत्रसंचालन देवदत्त साने यांनी केले तर आभार प्रताप सुर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन आरती कोकुलवार, बाळू पावडे, संजय कर्वे, कोंडिबा गाडेवाड, रघुवीर श्रीरामवार, मधुकर खंडेलोटे ,सोपान यनगुलवाड यांनी केले.
000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   405   नांदेड जिल्ह्यात ड्रोन उडविण्यास प्रतिबंध नांदेड दि. 3     - नांदेड जिल्ह्यात   4   ते   7   मे 2024   या कालावधीत ड्रो...