Tuesday, August 28, 2018


कापुस पिकावरील शेंदरी बोंडअळी
नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे  

नांदेड दि. 28 :- कापुस पिकावरील शेंदरी बोंडअळी नियंत्रणासाठी  कृषि विभागामार्फत राबविण्यात आलेली मोहिम अशीच पुढे सुरु ठेवून शेतकऱ्यांना सतत मार्गदर्शन करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिल्या.
कापुस पिकावरील शेंदरी बोंडअळी नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.बी. चलवदे, कृषि विकास अधिकारी, कृषि विद्यापीठ व कृषि विज्ञानकेंद्र येथील शास्त्रज्ञ, जिल्हा समन्वयक क्रॉपसॅप, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, एमएआयडीसी प्रतिनिधी, जिनिंगमिल्सचे प्रमुख, बियाणे व किटक नाशके उत्पादक विक्री संघटनेचे प्रतिनिधी, कापुस उत्पादक प्रगतीशील शेतकरी उपस्थित होते.
बैठकी ध्याच्या पिक परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच लवकर लागवड केलेल्या कापुस क्षेत्रावर जुलै 2018 मध्ये जास्त प्रमाणात दिसुन आलेला प्रादुर्भाव कृषि विभाग, कृषि विद्यापीठ कृषि विज्ञानकेंद्र यांचे मार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजना मार्गदर्शनामुळे सद्यस्थितीत कमी झालेला असुन सदरील प्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्यासाठी Mass Trapping एकात्मिक किड व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे सर्वानुमते नमुद करण्यात आले.
सोयाबीन मुग पिकावर सद्या किडींचा प्रादुर्भाव आढळुन येत असुन कृषि विद्यापी कृषि विज्ञान केंद्र येथील शास्त्रज्ञांनी सोयाबीन वरील खोड माशीसाठी ट्रायझोफॉस डायक्लोरोव्हासची करपारोगासाठी कार्बेन्डाझाईम + मंकॉझेब किंवा टेबेकॉनझोले + सल्फर ची  फवारणी करणे तसेच मुगावरील भुरी रोगासाठी गंधकाचा वापर करण्याच्या शिफारशी सांगितल्या.  
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   407 लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  नांदेड दि. ४ मे :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 प्र...