Tuesday, August 21, 2018

राज्य परिवहन महामंडळात
शिकाऊ उमेदवाराची भरती   
                  नांदेड, दि. 21 :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभागमध्ये सन 2018-19 सत्रासाठी वेगवेगळया व्यवसायासाठी शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) म्हणुन 56 पदे (यांत्रिक-42, विजतंत्री-6, शिट मेटल वर्क्स-5, पेंटर-1, अभियांत्रिक पदवीधर / पदवीका-2 अशी एकुण 56 ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहेत, अशी माहिती विभाग नियंत्रक, राज्य परिवहन नांदेड यांनी केले आहे.
                  आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी सर्वप्रथम एमआयएस वेब पोर्टलवरील www.apprenticeship.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करुन MSRTC Division Nanded या आस्थापनेसाठी ऑनलाईन अप्लाय करणे आवश्यक आहे. तसेच अभियांत्रिकी पदवीधर / पदवीकाधारक उमंदवारांनी NATS पोर्टलवरील www.mhrdnats.gov.in या राष्ट्रीय वेबसाईटवर दिलेल्या सुचनांप्रमाणे ऑनलाईन नोंदणी करुन MSRTC  Nanded Division या आस्थापने (Establishment) करीता ऑनलाईन अप्लाय करणे आवश्यक आहे.
                  ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांना शिकाऊ उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारांना विभाग नियंत्रक राज्य परिवहन नांदेड कार्यालयाचा छापील नमुन्यातील अर्ज भरुन 20 सप्टेंबर 2018 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत विभाग नियंत्रक राज्य परिवहन नांदेड या कार्यालयास दाखल करावे लागतील. हे छापील अर्ज विभागीय कार्यालय, कर्मचारी वर्ग शाखा राप नांदेड येथे दि.20 सप्टेंबर रोजी पर्यंत शनिवार व सुट्टीचे दिवस वगळुन सकाळी 10 ते दुपारी 3 यावेळेत मिळतील व लगेच स्विकारले जातील. सदरहु अर्जाची किंमत (GST 18 % सहीत) खुल्या प्रवर्गाकरीता रु. 590/- व मागासवर्गीयांसाठी रु. 295/- आहे.
                  जे उमेदवार सदरच्या वेबसाईटवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करुन MSRTC  Nanded Division या आस्थापने (Establishment) करीता ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर रा.प.नांदेड विभागाचे विहीत नमुन्यातील छापील अर्ज भरुन देतील त्याच उमेदवारांना शिकाऊ उमेदवारी करता येईल. म्हणजेच त्यांनाच शिकाऊ उमेदवार म्हणन भरती करण्यात येईल व त्याच उमेदवारांचे कॉन्ट्रक्ट फॉर्म रजिस्टर होतील. जे उमेदवार सदरच्या वेबसाईटवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करुन MSRTC  Nanded Division या आस्थापनेकरीता ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर रा.प.नांदेड विभागाचे विहीत नमुन्यातील छापील अर्ज भरुन देणार नाहीत त्या उमेदवारांचा शिकाऊ उमेदवारीकरीता विचार केला जाणार नाही.
                  मुदतीनंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही व ते रद्द समजले जातील व त्यांना या कार्यालयाचा छापील नमुन्यातील अर्ज देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन विभाग नियंत्रक राज्य परिवहन नांदेड यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   401 लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान   10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार   नांदेड दि. 2 ...