Thursday, July 12, 2018


जिल्ह्यात शनिवारी
राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन
नांदेड दि. 12 :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड तर्फे शनिवार 14 जुलै 2018 रोजी जिल्हा न्यायालय, नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय सहकार न्यायालय, नांदेड येथे राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.
            या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये आज पर्यंत न्यायालयात प्रलंबित प्रकरणांपैकी 2 हजार 82 प्रकरणे त्यात 739 दिवाणी 1 हजार 343 फौजदारी प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यात दिवाणी प्रकरण, मो.. दावा प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे तसेच इतर दिवाणी प्रकरणे, बॅंक कर्ज वसुली प्रकरण इत्यादी प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्याच बरोबर फौजदारी प्रकरणेही जी तडजोड पात्र आहेत अशी प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.
            याशिवाय, या लोकअदालतीत विद्युत कंपनी, विविध बॅंका, भारत संचार निगम यांचे थकीत बाकी येणे बाबतची दाखल पुर्व प्रकरणे तसेच, विविध मोबाईल कंपन्यांचीही थकित रकमेबाबतची प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार असुन आतापर्यंत 5 हजार 679 दाखल पूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आलेली आहेत.
            या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये अमरीकसिंघ वासरीकर, जिल्हा सरकारी वकिल तसेच जिल्हयातील सर्व  विधीज्ञ आणि विविध विमा कंपनीचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभागाचे अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. या लोकअदालतीत मोठया संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे तसेच सर्व संबंध पक्षकारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. टी. वसावे यांनी केले आहे.    
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 409   वादळी वारे वाहण्याची ,   विजेच्या कडकडाटासह , ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता   नांदेड दि.  6  मे :-   प्रादेशिक ...