Friday, June 15, 2018


ब्रिगेडियर डी. के. पात्रा यांनी
माजी सैनिकांच्या अडचणी जाणून घेतल्या
नांदेड, दि. 15 :- औरंगाबादचे स्टेशन कमांडर  ब्रिगेडियर डी. के. पात्रा यांनी 13 जून रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाला भेट दिली. यावेळी माजी सैनिक / विधवा व वीरपत्नी, वीरपीता यांचे बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत माजी सैनिकांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची ब्रिगेडियर श्री. पात्रा यांनी भेट घेवून माजी सैनिकांचे प्रकरणे लवकर निकाली काढावे यासाठी चर्चा केली.
यामध्ये प्रमुख्याने माजी सैनिकांच्या जागेवर अतिक्रमण करण्याचे प्रकरणे होती. तसेच ECHS मध्ये नवीन कार्ड बनविण्यासाठी कार्यवाही करावी. नांदेडची CSD Canteen लवकर सुरु करावी अशी मागणी माजी सैनिकांनी केली यावर कमांडर  ब्रिगेडियर श्री. पात्रा यांनी  Grocery Store सुरु करण्याबाबत कार्यवाही होत असल्याचे सांगितले. स्टेशन कमांडर यांनी ECHS साठी नवीन इमारत तयार करणार असल्याचे सांगितले. स्टेशन कमांडर सोबत कर्नल आर. शर्मा व Oic Echs गृप कमांडर रामाकृष्ण उपस्थित होते.
बैठकीचे प्रास्ताविक कल्याण संघटक कमलाकर शेटे यांनी करुन  स्टेशन  कमांडर यांना नांदेडच्या माजी सैनिकांचे समस्याबाबत माहिती दिली. बैठकीस जवळपास 80 माजी सैनिक / विधवा व वीरपत्नी, वीरपीता होते. कार्यालयातील कल्याण संघटक  सतेंद्र चवरे, श्री. कदम यांनी बैठकीचे संयोजन केले.
संगठक चे अध्यक्ष श्री संजय पोतदार, श्री पठान हयुन व श्री देशमुख वेंकट यांनी माजी सैनिकांच्या ECHS  मध्ये येणाऱ्या समस्यां मांडल्या.  विष्णुपूरी येथील ECHS ची नवीन जागेची पाहणी करण्यात आली व सैनिकी मुलांचे वसतीगृह येथे भेट देवून CSD जागेची पाहणी करण्यात आली.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 409   वादळी वारे वाहण्याची ,   विजेच्या कडकडाटासह , ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता   नांदेड दि.  6  मे :-   प्रादेशिक ...