Saturday, June 30, 2018


सुधारीत बीज भांडवल योजना ,
जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेसाठी
अर्ज वितरण 9 जुलै पासून सुरु होणार
नांदेड, दि. 30 :- जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सन 2018-19 मध्ये सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी सुधारीत बीज भांडवल योजना व जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेंतर्गत व्यवसायासाठी कर्ज वितरणाचे अर्ज 9 जुलै ते 30 सप्टेंबर 2018 या कालावधीत वितरीत करण्यात येणार आहे. इच्छूक पात्र सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड येथील जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.
सुधारीत बीज भांडवल योजनेंतर्गत व्यवसाय, उत्पादक उद्योगासाठी 25 लाख व सेवा व्यवसायाकरीता 10 लाख रुपयापर्यंत कर्ज दिल्या जाते. अर्जदाराचे वय 18 ते 50 च्या दरम्यान असावे. अर्जदाराने सेवायोजन कार्यालयात नाव नोंदणी केलेली असावी. अर्जदाराचे शिक्षण इयत्ता सातवीच्या पुढे असावे. अर्जदारास कर्ज मंजूर झाल्यास बँकेमार्फत 75 टक्के कर्ज व उद्योग केंद्रामार्फत सर्वसाधारण 15 टक्के व मागासवर्गीयांसाठी 20 टक्के सुधारीत बीज भांडवल 6 टक्के व्याज दराने मिळेल.
जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना उत्पादक उद्योगासाठी लागू असून कर्ज मर्यादा 20 लाख रुपये आहे. अर्जदाराचे वय 18 ते 50 च्या दरम्यान असावे. अर्जदार ग्रामीण भागातील कारागीर असावा. अर्जदार शिक्षीत / निरक्षर असावा. अर्जदारास कर्ज मंजूर झाल्यास बँकेमार्फत 75 टक्के ते 65 टक्के कर्ज व जिल्हा उद्योग केंद्र नांदेड मार्फत सर्वसाधारण करीता 20 टक्के व अनु. जाती / जमातीकरीता 30 टक्के मार्जीन मनी बीज भांडवल 4 टक्के व्याज दराने मिळेल, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
0000   

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   401 लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान   10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार   नांदेड दि. 2 ...