Friday, May 11, 2018


महाराष्ट्र दुय्यम सेवा गट- ब
पुर्व परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
नांदेड दि. 11 :-  महाराष्ट्र दुय्यम सेवा गट- ब पुर्व परीक्षा 2018 ही रविवार 13 मे 2018 रोजी नांदेड शहरातील 40 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
नांदेड शहरातील विविध 40 विद्यालय, महाविद्यालयातील केंद्रावर सकाळी 10.30 ते दुपारी 12 या कालावधीत परीक्षा होणार असून त्यासाठी 11 हजार 376 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. परीक्षेचे कामकाज स्वच्छ व सुसंगत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात 13 मे रोजी सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू राहील. या कालावाधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी आदेशात नमूद केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

 जिल्हा परिषद हायस्कूल चौफळा येथील मतदान केंद्रावर सायंकाळी साडेपाच वाजता मतदानासाठी मतदारांच्या लागलेल्या रांगा. जिल्हा परिषद हायस्कूल चौफळ...