Friday, May 25, 2018


शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा
तुषार संच बसविण्यासाठी  
ऑनलाईन नोंदणी सुरु
नांदेड दि. 25 :- प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत सुक्ष्म सिंचन ोजना सन 2018-19 साठी ई-ठिबक आज्ञावलीवर ठिबक / तुषार संच बसविण्यासाठी शेतक-यांची ऑनलाईन नोंदणी चालु झाली आहे. लाभार्थी आणि अर्ज नोंदणी करताना अर्जदारांनी अचुकपणे नोंद करावी. या योजनेचा शेतक-यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
ज्या शेतक-यांना ठिबक / तुषार संच बसवून अनुदानाचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी ई-ठिबक www.mahaagri.gov.in www.mahaethibak.gov.in या वेबसाईटवर लाभार्थी नोंदणी आणि अर्ज नोंदणी करावी. लाभार्थी नोंदणी आणि अर्ज नोंदणी करताना अर्जदारांनी पुढी बाबींची अत्यंत अचुकपणे नोंद करावी. अर्जदाराचे संपूर्ण नाव, गावाचे नाव (ज्या गावाच्या शिवारामध्ये संच बसवायचा आहे आणि ज्या गावाचा 7/12 जोडावयाचा आहे ते गाव), पिकाचे नाव ( ज्या पिकासाठी संच बसवायचा आहे ते पीक), पिकाचे अंतर, सुक्ष्म सिंचनचा प्रकार ठिबक / तुषार , गट क्रमांक (ज्या गटात संच बसवायचा आहे तो गट क्रमांक), गटाचे क्षेत्र (ज्या गटात संच बसवायचा आहे त्या गटातील अर्जदाराचे क्षेत्र), आठ- प्रमाणे क्षेत्र (अर्जदाराचे त्या गावातील 8 प्रमाणे एकूण क्षेत्र). अर्जदाराच्या आधार संलग्न असलेल्या बँक खात्याचा तपशील जसे बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक, आयएफसी कोड नंबर. ऑनलाईन अर्ज नोंदणी करताना याबाबींची अचुकपणे ों करणे गरजेचे आहे. त्याकरिता अर्ज नोंदणी झाल्यानंतर त्याची प्रिंट घ्यावी तिचे व्यवस्थीत वाचन करुन खात्री करावी. यापैकी एक जरी बाब चुकीची नोंदली गेली तरी संपूर्ण अर्ज रद्द करावा लागतो. यामध्ये दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करुन दिलेली नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. असेही आवाहन कृषि विभागामार्फत करण्य आले आहे.
00000

No comments:

Post a Comment