Thursday, May 17, 2018


पीक कर्जमाफीचे अर्ज करण्यास 20 मे मुदत
वंचित शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन 
नांदेड, दि. 17 :-  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतर्गत यापुर्वी विहित कालावधीत अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा रविवार 20 मे 2018 पर्यंत  आपले सरकार या सेवा केंद्रावर किंवा शेतकऱ्यांना https://csmssy.mahaonline.gov.in या पोर्टलवर स्वत: नोंदणी करुन युजर आय.डी. व पासवर्डच्या आधारे ऑनलाईन अर्ज सादर करता येतील.
काही शेतकरी वैयक्तिक कारणाने किंवा तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन अर्ज करु न शकल्यामुळे कर्जमाफीच्या योजनेत सहभागी होऊ शकले नाहीत. त्यांना लाभ देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी केली होती. त्यानुसार 20 मे 2018  पर्यंत  आपले सरकार  पोर्टलवर किंवा शेतकऱ्यांनी स्वत: मोबाईल ओटीपीद्वारा केल्यानंतरच संबंधित अर्ज अपलोड करण्यात येणार आहेत. आपले सरकार पोर्टलवर माहिती भरुन ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा नि:शुल्क आहे.
तसेच महाराष्ट्र शासनाचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे दि. 9 मे,2018 रोजी शासन निर्णयाद्वारे या योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. दि.1 एप्रिल 2001 ते 31 मार्च, 2009 पर्यत उचल केलेल्या पीक / मध्यम मुदत कर्जाची दि. 30 जून, 2016 रोजी थकीत असलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. दि. 1 एप्रिल,2001 ते 31 मार्च,2016 पर्यंत इमूपालन, शेडनेट, पॉलीहाऊस यासाठी मध्यम मुदत कर्ज घेतलेल्या व दि.30 जून, 2016 रोजी थकीत असलेल्या थकबाकीदार शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. शासन निर्णय दि.9 मे,2018 च्याप्रमाणे योजनेच्या व्याप्तीत वाढ केल्यामुळे संबंधित शेतक-यांनी 20 मे, 2018 पर्यंत आपले सरकार सेवा केंद्रावर किंवा शेतकऱ्यांनी https://csmssy.mahaonline.gov.in या पोर्टलवर स्वत: नोंदणी करुन युजर आय.डी. व पासवर्डच्या आधारे ऑनलाईन अर्ज भरुन  योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन प्रवीण फडणीस, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   280   सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आरटीओ कार्यालय राहणार  सुरु     नांदेड दि.  27  :-  सन  2023 2024  हे वित्तीय वर्ष दिनांक  3...