Thursday, April 5, 2018


बनावट खत विक्री प्रकरणी 
कृषि विभागाची कारवाई
नांदेड दि. 5 :-  जिल्हयात सन 2017-18 या वर्षात बनावट निविष्ठा प्रकरणी बियाणे-एक, रासायनिक खत-तीन व किटकनाशक औषधी-एक असे एकूण 5 पोलीस केसेस दाखल करण्यात आले आहेत.
नायगाव पंचायत समितीचे कृषि अधिकारी तथा खत निरिक्षक यांनी मे. शिवशंकर कृषि सेवा केंद्र नायगाव येथे भेट दिली असता मे. सहारा ॲग्रो केमिकल्स ॲन्ड फर्टीलायझर प्रा.लि. हडपसर पुणे उत्पादीत विद्राव्य खत 19:19:19 विक्री होत असल्याचे आढळून आले. हे खत संशयास्पद वाटल्याने खताचे नमुने काढून तपासणीसाठी खत विश्लेषण प्रयोगशाळेस पाठविले. त्यानुसार प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालात हे खत निकृष्ट दर्जाचे आढळून आले. त्यामुळे संबंधीत उत्पादक कंपनी मे. सहारा ॲग्रो केमिकल्स ॲन्ड फर्टीलायझर प्रा.लि. हडपसर पुणे, मे. भारतीया प्रगती किसान ॲग्रो नाथनगर नांदेड व मे. शिवशंकर कृषि सेवा केंद्र नायगाव यांच्या विरोधात नायगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचायत समिती कृषि अधिकारी एम. टी. राजे यांनी याप्रकरणी कार्यवाही केली असून सदर कार्यवाहीसाठी  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी पंडीत एस. मोरे, तंत्र अधिकारी ए.पी. पाटील, मोहीम अधिकारी व्ही.आर.सरदेशपांडे व कृषि अधिकारी व्ही. जी. अधापूरे यांनी मार्गदर्शन केले.
00000


No comments:

Post a Comment