Wednesday, April 18, 2018


अवैध टोरिक्षातून प्रवास करणे जनतेने टाळावे

 --- प्रादेशिक परिवहन अधिकारी

           नांदेड, दि.17:- जिल्ह्यातील सर्व जनतेस कळविण्यात येते की, खाजगी संवर्गातील नोंदणी असलेल्या टोरिक्षांची विशेष तपासणी मोहिम दिनांक 16 ते 15 मे, 2018 या दरम्यान नांदेड जिल्ह्यात राबविण्यात येणार असून, खाजगी संवर्गातील टोरिक्षा अवैधपणे प्रवासी वाहतूक करतांना आढळून आल्यास त्यांचे विरुध्द कारवाई करुन अशी वाहने अटकावून ठेवून दंड वसूल करण्यात येईल. तसेच अशा अवैधपणे चालणाऱ्या रिक्षांमधून प्रवासी वाहतूक करणे पुर्णत: बेकायदेशीर असल्याचे , अशा वाहनास अपघात झाल्यास, अशी वाहतूक मुळातच बेकायदेशीर असल्याने , कोणत्याही विमा संरक्षणास असे प्रवासी पात्र राहत नाहीत. म्हणून अशा अवैध टोरिक्षातून प्रवास करणे जनतेने टाळावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.  

****  

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   405   नांदेड जिल्ह्यात ड्रोन उडविण्यास प्रतिबंध नांदेड दि. 3     - नांदेड जिल्ह्यात   4   ते   7   मे 2024   या कालावधीत ड्रो...