Friday, April 6, 2018


भोकर तालुक्‍यातील जलयुक्‍त शिवार कामांची पाहणी
तलावातून गाळ काढल्यामुळे
साठवण क्षमता वाढण्यास मदत  
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
     
नांदेड दि. 6 :- तलावातून गाळ काढल्‍यामुळे तलावाची साठवण क्षमता वाढण्‍यास मदत होईल तसेच गाळामुळे शेताची उत्‍पादकता वाढेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
भोकर तालुक्यातील जलयुक्‍त शिवार अभियान, गाळमुक्‍त धरण व गाळयुक्‍त शिवार योजनेंतर्गत घेण्‍यात आलेल्‍या विविध कामांना जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी गुरुवार 5 मार्च रोजी भेटी दिली. यावेळी जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे हे उपस्थित होते.  
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी जलसंधारणच्‍या विविध कामाबाबत मार्गदर्शन करुन जलयुक्‍त शिवार अभियानाच्‍या कामाबाबत समाधान व्‍यक्‍त केले. जलयुक्‍त शिवार अभियान सन 2017-18 मधील सोनारी येथील कृषी विभागामार्फत घेण्‍यात आलेल्या शेततळे व जामदरी तांडा येथील ढाळीचे बांधाची पाहणी केली. जलयुक्‍त शिवार अभियान सन 2016-17 मधील नांदा बु. येथे वन विभागामार्फत घेण्‍यात आलेले खोल सलग समतल चर (डीप सी सी टी) व  धारजनी येथे यांत्रिकी विभागाच्या मशीनद्वारे लामकाणी ते धारजणी या नाल्‍याचे नाला खोलीकरण, रुंदीकरण कामांना तसेच सायाळ येथील लघुसिंचन जलसंधारण विभागाच्या सिमेंट नाला बांध कामास भेट देऊन पाहणी केली.
गाळमुक्‍त धरण गाळयुक्‍त शिवार योजनेतंर्गत रहाटी बु. येथील तलावातून गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ जिल्‍हाधिकारी श्री डोंगरे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. वनश्री भोकर या स्‍वयंसेवी संस्‍थेचे सहकार्य सदर कामास लाभत आहे. यावेळी रहाटीचे सरपंच व ग्रामस्‍थ मोठया संख्‍येने उपस्थित होते.  विविध कामांबाबत भोकरचे उपविभागीय अधिकारी दीपाली मोतीयेळे यांनी माहिती दिली.
यावेळी तहसिलदार भोकर व्‍यंकटेश मुंडे, तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, यांत्रिकी विभागाचे उपअभियंता दत्‍तात्रय सावंत, जिल्हा परिषद ल.पा. उपविभाग भोकरचे  उपअभियंता सरनाईक, वन परिक्षेत्र अधिकारी आशिष हिवरे, लघुसिंचन जलसंधारण विभागाचे शाखा अभियंता सदावर्ते तसेच सर्व मंडळ अधिकारी, महसूल विभागाचे कर्मचारी, मंडळ कृषी अधिकारी ,संबंधित तलाठी,  ग्रामसेवक, वनपाल, कृषी सहाय्यक, वनश्री भोकरचे अध्‍यक्ष राठोड व ग्रामस्‍थ उपस्थित होते.
000000

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...