Friday, April 13, 2018


महाबीजचे खरीप हंगामासाठी बिजोत्पादन
कार्यक्रमाचे अग्रिम आरक्षण योजना सुरु
नांदेड, दि. 13 :- खरीप  सन 2018-19 च्या हंगामात सोयाबीन, उडीद व सुधारित कापूस इत्यादी पिकाचे प्रमाणित बियाणे उत्पादन करण्यासाठी अग्रिम आरक्षण योजना सुरु झाली आहे. जिल्ह्यातील बिजोत्पादक शेतकऱ्यांनी या  बिजोत्पादन कार्यक्रमात सहभागी व्हावे. यासाठी महाबीज जिल्हा कार्यालय आग्रवाल बिल्डिंग नवा मोंढा नांदेड येथे भेट देऊन महाबीज बँक खात्यात एकरी शंभर रुपये भरणा करून अग्रिम आरक्षण निश्चित करावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक महाबीज नांदेड यांनी केली आहे.
अग्रिम आरक्षण योजनेची ठळक वैशिष्ट्ये : आरक्षण कालावधी 10 एप्रिल ते 10 मे 2018 आहे. उपलब्ध पिके/वाण – सोयाबीन (JS-335, MAUS-71, MAUS-158 व  MAUS-162 ), उडीद-TAU-1 व सु. कापूस –NH-615 इत्यादी. आवश्यक कागदपत्रे- तलाठ्याचे जमीन धारणेचे 7/12 किंवा 8 अ उतारा (होल्डिंग), आधार कार्डाची आणि स्वतःचे  बँक खात्याची  झेरॉक्स प्रत इत्यादी. कच्चे बियाणे आवक वाढीसाठी महाबीज प्रक्रिया केंद्र धनेगाव पासून 50 किलोमीटर अंतरापर्यंतच्या गावांना प्रथम प्राधान्य असेल. लॉटसाईजसाठी तीन एकर पेक्षा कमी क्षेत्रासाठी आरक्षण देणे अशक्य आहे.सर्व बिजोत्पादकाना उत्पादित कच्चे बियाणे 50 किलो ग्रामच्या बारदान पोत्यात भरुन महाबीजचे बीज प्रक्रिया केंद्र धनेगाव येथे स्वखर्चाने पोहच करावयाचे आहे.
महाबीजची ग्रामबीज उत्पादन संकल्पना वाढीसाठी विशेष सवलत योजना : जर एकाच गावातील शेतकऱ्यांनी सर्व पिक / वाण मिळून 201 हेक्टर पेक्षा ज्यास्त क्षेत्र आरक्षण करून नोंदणी केली तर त्यांना प्रमाणीकरणचे तपासणी शुल्क शंभर टक्के  परत केले जाईल. (एकरी रुपये 150/- ).  हेक्टर 151 ते  200 पर्यंत क्षेत्र आरक्षण करून नोंदणी केली तर 75 टक्के तपासणी शुल्क परत केले जाईल. शंभर ते 150 हेक्टर पर्यंत क्षेत्र आरक्षण करून नोंदणी केली तर 50 टक्के तपासणी शुल्क परत केले जाईल. तसेच ज्या गावातील शेतकरी सर्व पिक व वाण  मिळून 5 हजार क्विंटल मात्रा कच्चे बियाणे उत्पादित करतील व महाबिजला पोहोच केल्यास त्या गावाला रुपये 21 हजार आणि 3 हजार क्विंटल मात्रेला 15 हजार रुपये बक्षीस दिले जाईल.
महाबीजचे खरेदी धोरण-  जिल्ह्यातील  नांदेड, नायगाव आणि  देगलूर या  कृषी उत्पन्न बाजार समिती चे       उचतम सरासरी बाजारभाव यावर  आधारित आहे. सोयाबीन- 1 डिसेंबर ते 30 जानेवारी 2018 चे बाजार भाव + 25 टक्के वाढीव दर + शासनाकडून काही अनुदान मिळाल्यास समप्रमाणात विभागून देण्यात येईल. उडीद - 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2018 चे बाजार भाव + 20 टक्के वाढीव दर + शासनाकडून काही अनुदान         मिळाल्यास समप्रमाणात विभागून देण्यात येईल. कापूस- महाराष्ट्र फेडरेशन किंवा CCI किंवा महाबीज कमिटीचे दर + बोनस प्रती क्विंटल 350 ते 375 रुपये अनुव्षिक शुद्धतेवर देय असेल.
गुणवत्तेवर आधारित प्रोत्साहनपर बक्षीस योजना- बियाण्याची गुणवत्ता वाढीसाठी महाबीज पुढील अतिरिक्त प्रोत्साहन पर वाढीव दर देईल. सोयाबीन जर शेतकऱ्यांनी उत्पादित कच्चे बियाणे घरुन चळणी करुन महाबीजला पुरवठा केले आणि त्याचे लॉटमध्ये महाबीजच्या प्रक्रियेत चळणी खाली अनुक्रमे 6, 8 किंवा 10 टक्के इतके कमी निम्न दर्जा बियाणे निघाले त्या सर्व बिजोत्पाद्कास प्रती क्विंटल 100, 75 व 50 रुपये आणि  उगवण क्षमतेत 80 किंवा 85 टक्के वाढ झाल्याची दिसून आल्यास  75 व 100  रुपये वाढीव दर देण्यात येईल. उडीद जर उडीद  लॉट मध्ये 8 किंवा  10 टक्के इतके कमी निम्न दर्जा बियाणे निघाले त्यांना प्रती  क्विंटल अनुक्रमे रुपये 125 व 100 आणि  उगवण क्षमतेत 85 व 90 टक्के वाढ झाल्याची दिसून आल्यास रुपये 100 व 125 वाढीव दर देण्यात येईल, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
0000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   392   23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये   ·      लोकसभा...