Monday, March 5, 2018


विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी
प्रशासन कटिबद्ध - जिल्हाधिकारी रु डोंगरे
नांदेड दि. 5 :- विद्यार्थ्यांसाठी अभ्यास-मुलाखत मार्गदर्शनसराव चाचणी परीक्षेसोबत त्यांचेवरील मानसिक स्थितीचा विचार करुन ताण-तणावाचे व्यवस्थापनसर्वांगीण विकासासाठी जिल्हा प्रशासन टिबद्ध असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी रु डोंगरे यांनी केले.
            स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने "उज्ज्वल नांदेड" मोहिम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय सेतू समिती, नांदेड मनपा जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्यावतीने आयोजित दरमहा 5 तारखेच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरा जिल्हाधिकारी श्री डोंगरे आज बोलत होते.
            यावेळी सुप्रसिद्ध मानसोपचार ज्ज्ञ डॉ. नंदकुमार मुलमुले, पुणे येथील प्रा. अभिजित राठोड, नायगावचे मुख्याधिकारी प्रियंका टोंगे, प्रा.जगदीश राठोड, गणेश कऱ्हाडकर जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            पहिल्या सत्रातील प्रमुख वक्ते डॉ. मुलमुले यांनी ताणतणावाचे व्यवस्थापन सुखाचा शोध या विषयावर विद्यार्थ्यांना आपल्या खुसखुशीत विनोदी शैलीत मार्गदर्शन केले. डॉ. मुलमुले यांनी विद्यार्थ्यांना यशाचा सतत ध्यास करणे आवश्यक असल्याचे सांग अपयशाचा किंचतही विचार करता आनंदी मनाने पुढे मार्गक्रमण करावे, असे सांगीतले. सुखाचा शोध म्हणजे नेमके काय ? याबाबत पद, पैसा, प्राप्तीनंतरही आनंद मिळता आणखी काही मिळविण्याची लालसा, ईर्षा याबाबी माणसांना सुखी करता दु:खीच करीत असल्याचे प्रकर्षाने जाणवते. यासाठी कोणत्याही बाबतीत समाधानी असणे म्हणजे सुखी असणे होय असे डॉ. मुलमुले म्हणाले.
            दुसऱ्या सत्रा प्रा. राठोड यांनी राजकोषिय धोरण, वित्तीय तूट अर्थसंकल्प 2018 याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अर्थसंकल्पाची रचना, शुन्याधारित अर्थसंकल्प, फलनिष्पती अर्थसंकल्प, लिंगाधारित अर्थसंकल्प याविषयी माहिती दिली. सोबत राजकोषीय व्यवस्थापन, वित्तीय तूट यांचे परीक्षेसंबध महत्व याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
सुत्रसंचलन जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. हुसे यांनी यांनी केले तर आभार आरती कोकुलवार यांनी मानले. सुरुवातील श्री कऱ्हाडकर यांच्या मराठी शब्दसंग्रह ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शिब यशस्वीतेसाठी प्रताप सुर्यवंशी, संजय कर्वे, कोंडीबा गाडेवाड, मुक्तीराम शेळके, मयुर कल्याणकर, लक्ष्मण शेन्नेवाड, मनोज उरुडवाड रघुवीर श्रीरामवार यांनी संयोजन केले.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 409   वादळी वारे वाहण्याची ,   विजेच्या कडकडाटासह , ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता   नांदेड दि.  6  मे :-   प्रादेशिक ...