Monday, March 12, 2018


प्रसार माध्यमांमध्ये काम करताना कल्पकता महत्वाची
-माहिती संचालक देवेंद्र भुजबळ

औरंगाबाद, दि.12 :- शासकीय खाजगी प्रसार माध्यमांमध्ये काम करताना कल्पकता महत्वाची असून माध्यमांच्या बदलत्या युगात स्वत:ला सिध्द करण्याची क्षमता विकसीत केली गेली पाहिले, असे मत माहिती जनसंपर्क मराठवाडा विभागाचे माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी  आज येथे व्यक्त केले.
देशपातळीवर कार्यरत असणाऱ्या पब्लिक रिलेशन्स कॉन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने जनसंपर्क क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रतिष्ठेच्या चाणक्यपुरस्काराने नुकतेच पुणे येथे श्री.भुजबळ यांना सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्त्माहिती जनसंपर्क महासंचालनालय मराठवाडा विभाग औरंगाबाद कार्यालयात त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.
श्री.भुजबळ पुढे म्हणाले, माध्यमांमध्ये काम करताना कल्पकतेसोबतच भाषेलासुध्दा फार महत्व आहे. आधुनिक युगात माध्यमांचे स्वरुप बदललेले आहे. त्याचबरोबर माध्यमांचे तंत्रसुध्दा बदललेले आहे. त्यामुळे विशेष शैलीत लिखाण केल्यास त्याची दखल विविध माध्यमांत घेतली जाते. त्यामुळे सतत लिखाण करणे आवश्यक आहे. शासकीय सेवेत राहुन विविधांगी लिखाणामुळे मला हा पुरस्कार मिळाला आहे. आपण करत असलेल्या सेवेचा फायदा वंचित घटकांपर्यत करुन देणे महत्वाचे असते. माध्यमात काम करताना बदलत्या माध्यमाचा वापर करुन आपण कल्पकतापूर्ण लिखाण केले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.  हा कॉर्पोरेट पुरस्कार असून जनसंपर्क क्षेत्रातील सर्वोच्च संस्थेमार्फत हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मला मनस्वी खुप आनंद झाला आहे असे ते म्हणाले. 
कार्यक्रमात लातूर विभागाचे उपसंचालक यशवंत भंडारे आपल्या मनोगतात म्हणाले की, देवेंद्र भुजबळ यांच्या 32 वर्षाच्या शासकीय सेवेतील उत्कृष्ट कामाची नोंद म्हणून त्यांना चाणक्य पुरस्काराने गौरविले आले आहे ही महासंचालनालयासाठी फार मोठी गौरवाची बाब असून देशपातळीवरील जनसंपर्क क्षेत्रातील सर्वोच्च संस्थेतर्फे शासकीय गटातून श्री.भुजबळ यांना हा पुरस्कार देण्यात आला, असे सांगुन त्यांनी श्री.भुजबळ यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 
जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, सहायक संचालक डॉ.रवींद्र ठाकुर, माहिती अधिकारी वंदना थोरात, माहिती सहायक संजीवनी पाटील यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माहिती सहायक श्याम टरके यांनी केले तर संहिता लेखक रमेश भोसले यांनी आभार व्यक्त केले. 
या कार्यक्रमाच संचालक माहिती कार्यालयातील आणि जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
******


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   401 लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान   10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार   नांदेड दि. 2 ...