Thursday, January 18, 2018

विद्युत सुरक्षा सप्ताह संपन्न  
नांदेड, दि. 18 :- उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्यावतीने राज्यात विद्युत सुरक्षा सप्ताह 11 ते 17 जानेवारी 2018 या कालावधीत संपन्न झाला. या सप्ताहाचा उद्देश शॉक लागून प्राणी किंवा मानवी हानी होऊ नाही हा होता. यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचा समारोप महापौर श्रीमती शिलाताई भवरे, कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, मुख्य अभियंता अविनाश पाटोळे, विकास बडे, अविनाश कोंडावार, अधीक्षक अभियंता सुरा नलावडे, विनय नागदेव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.  
जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती पवार यांनी विद्युत सुरक्षा सप्ताहचा उपक्रम चांगला असून विद्युत सुरक्षीततेचे कार्यक्रम नेहमी करावेत, असे सांगितले. कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर यांनी विजेचे महत्व व त्याचा वापर योग्य प्रकारे करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी सुरक्षा सप्ताहात उल्लेखनीय काम केलेले अधिकारी, कर्मचारी व शुन्य अपघात असलेला विभागाला सन्मानीत करण्यात आले. प्रास्ताविक वी. ही. शहारे यांनी केले. कार्यक्रमास महावितरण व विद्यापिठातील अधिकारी, कर्मचारी, विद्युत ठेकेदार संघटना, आदींची उपस्थिती होती.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   392   23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये   ·      लोकसभा...