Tuesday, January 16, 2018

                                                                                                                        दिनाकः-१६/०१/२०१७
प्रेस नोट
लोकशाही निवडणूक व सुशासन या विषयावर विभागीय परिषद

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, जिल्हा परिषद, आणि नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाही निवडणूक व सुशासन या विषयावर विभागीय परिषद बुधवार, दि.१७ जानेवारी रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कै. डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. 
देशाच्‍या जडणघडणीत आणि विकास प्रक्रियेमध्‍ये स्‍थानिक संस्‍थांना योग्‍य ते स्‍थान मिळवून देण्‍यासाठी १९९२-९३ मध्‍ये ७३ व ७४ वी घटना दुरूस्‍ती करण्‍यात आली स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांना घटनात्‍मक स्‍थान प्राप्‍त करून देणा-या या ऐतीहासीक घटना दुरूस्‍तीस २५ वर्ष पुर्ण होत असल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांकरिता महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, मुबई यांच्या संकल्पनेतून परिषदेचे आयोजित करण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याच्या वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे राज्यमंत्री मा.ना. अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, दि.१७ जानेवारी रोजी सकाळी १०.०० वाजता विभागीय परिषदेचा उद्घाटन समारंभ पार पडणार असून यावेळी नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा.श्रीमती शांताबाई पवार (जवळगांवकर), स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ. पंडित विद्यासागर, नांदेड लोकसभा सदस्य मा.खा.अशोक चव्हाण, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर मा. श्रीमती शिलाताई भवरे, विधान परिषद सदस्य मा.आ.अमरनाथ राजूरकर, उत्तर नांदेड विधानसभा सदस्य मा.आ.डी.पी.सावंत, दक्षिण नांदेड विधानसभा सदस्य मा.आ. हेमंत पाटील, आणि औरंगाबाद विभागीय आयुक्त भा.प्र.से. मा.डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे.
ही विभागीय परिषद तीन सत्रामध्ये पार पडणार असून प्रथमसत्र सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० यावेळेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था व शासनाचे संबंध तीन एफ (Funds, Functions & Functionaries) चे हस्तांतरण व उद्भवणाऱ्या अडीअडचणी या विषयावर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, परभणी महानगरपालिकेचे आयुक्त राहुल रेखावार, भाप्रसे., पीपल्स महाविद्यालय, नांदेडचे सहयोगी प्राध्‍यापक डॉ.ए.एन. सिद्धेवाड आणि परभणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कांतराव देशमुख हे प्रमुख वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.
व्‍दितीय सत्र प्रामुख्याने महिला व दुर्बल घटकांसाठी दुपारी १२.१५ ते १.४५ या दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थाकडून सर्व समावेशक प्रशासन कसे करता येईल ? या विषयावर पार पडणार असून यावेळी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या माजी महापौर शैलजा स्वामी, लातूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, ज्ञानोपासक महाविद्यालय, परभणीचे सहयोगी प्राध्‍यापक डॉ. सुनील शिंदे आणि नांदेडच्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शोभा वाघमारे यांची व्याख्याने आयोजित करण्यात आलेली आहेत.
तृतीय सत्र दुपारी ३ ते ४.३० वेळेत पार पडणार असून यावेळी लातूरचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, भा.प्र.से., नांदेडचे सामाजिक कार्यकर्ते माधवराव पाटील शेळगांवकर, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, औरंगाबाद महानगरपालिकेचे माजी नगरसचिव एम.ए. पठाण आणि देगलूर महाविद्यालयाचे लोकप्रशासन विभागप्रमुख डॉ. बालाजी कतुरवार यांची आवश्यक त्या निवडणूक सुधारणा या विषयावर व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.
दुपारी ४.४५ ते ५.३० या वेळेमध्ये खुले चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून त्यानंतर परिषदेचा समारोप स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ. पंडित विद्यासागर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून यावेळी नांदेडचे जिल्हाधिकारी भा.प्र.से. अरुण डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. 
या परिषदेस स्थानिक स्वराज्य संस्थामधील पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी, विद्यापीठ, महाविद्यालयाचे प्रतिनिधी इत्यादी सुमारे २०० प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आलेला आहे. नांदेड जिल्‍हाधिकारी अरूण डोंगरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली आणि परिषदेच्या यशस्वितेसाठी, आयोजन, डाक्युमेंटेशन, स्मरणीका, वक्ता नियोजन, स्टॉल (प्रदर्शनी), स्वागत, निमंत्रण, प्रसिद्धी, भोजन आणि रजिष्ट्रेशन आदी समित्यांचे गठन करण्यात आले आहे. नांदेड जिल्‍ह्याचे समन्‍वय अधिकारी तथा अप्‍पर जिल्‍हाधिकारी संतोष पाटील आणि सहाय्यक समन्‍वय अधिकारी तथा उपजिल्‍हाधिकारी (सामान्‍य) अनुराधा ढालकरी यांच्‍या नियोजनाखाली सर्व समित्‍या कर्तव्‍य पार पाडीत आहेत.


                                                                                जिल्‍हाधिकारी नांदेड करीता

सदर कार्यक्रमाचे लाईव्‍ह टेलीकास्‍ट Nic मार्फत प्रदर्शीत करण्‍यात येणार आहे. नागरीकांनी यु टयूब या वेबसाईटवर collector Nanded हे शब्‍द सर्च करून या लाईव्‍ह प्रक्षेपणाचा लाभ घेता येईल. नांदेड जिल्‍ह्याच्‍या वेबसाईटवर देखील लाईव्‍ह टेलीकास्‍टची लींक उपलब्‍ध करून देण्‍यात येत आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रति,
मा.संपादक/प्रतिनिधी
दैनिक वृत्‍तपत्र/ दुरचित्रवाणी/ केबल टि.व्‍ही.
       
        महोदय,

सोबतची बातमी आपल्‍या माध्‍यमामधून प्रसिध्‍दीस देवून सहकार्य करावे ही विनंती.                                                   

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   407 लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  नांदेड दि. ४ मे :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 प्र...