Saturday, December 9, 2017

जिल्हास्तरीय निवडणूक
ज्ञान स्पर्धेचे आज आयोजन
नांदेड, दि. 9 :- भविष्यातील नवमतदारांना निवडणूक विषयक विविध बाबीचे ज्ञान व्हावे या उद्देशाने निवडणूक ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तालुका स्तरावरील स्पर्धेतून पात्र ठरलेल्या प्रत्येक शाळेच्या प्रथम व द्वितीय परिक्षार्थीची जिल्हापातळीवर परिक्षा रविवार 10 डिसेंबर 2017 रोजी केंब्रीज हायस्कूल शिवाजीनगर नांदेड येथे दुपारी 1 ते 1.30 या कालावधीत आयोजित केली आहे. विद्यार्थ्यांनी या परिक्षेस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
या परिक्षेत एकूण 30 वस्तुनिष्ठ स्वरुपातील प्रश्न असून त्यासाठी 20 मिनिटे इतका वेळ परिक्षार्थीना देण्यात येणार आहे. या परिक्षेत प्रथम व द्वितीय येणाऱ्या परिक्षार्थ्यांची राज्य स्तरावरील परिक्षा औरंगाबाद येथे होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने अखिल भारतीय स्तरावर 14 ते 17 या वयोगटातील इयत्‍ता 9 वी ते 12 वीतील विद्यार्थ्यांसाठी निवडणूक ज्ञान स्पर्धा सन 2017-18 आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने नांदेड जिल्हयातील सर्व शाळा, महाविद्यालयातील इयत्ता 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांची शालेय स्तरावरील परीक्षा 9 नोव्हेंबर रोजी घेण्यात आली होती, असेही प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   392   23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये   ·      लोकसभा...