Thursday, September 14, 2017

त्वचारोग तपासणी शिबीर संपन्न
नांदेड दि. 14 :- श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड व समता मेमोरीयल फाऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा मध्यवर्ती कारागृह नांदेड येथे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. बी. पी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली त्वचारोग तपासणी व उपचार शिबीर नुकतेच घेण्यात आले.
 शिबिराच्या अनुषंगाने कारागृहातील 98 कैदी व 6 कर्मचारी अशा 104 रुग्णाच्या त्वचेची तपासणी जिल्हा रुग्णालय येथील त्वचारोग तज्ज्ञ  डॉ. दीपक हजारी यांचेकडून करण्यात आली. समुपदेशक सदाशिव सुवर्णकार यांनी संबंधीत रुग्णांना त्वचेच्या आजारापासून दूर राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबीचे  समुपदेशन केले. शिबिरास वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. के. साखरे, कारागृह अधीक्षक जी. के. राठोड, तुरुंग अधिकारी बलभीम माळी, फार्मासिस्ट आर. के. देवकते, सुभेदार राजेंद्र पाटील, समता मेमोरीयल फाऊडेशन समन्वयक प्रविण गव्हाणे आदी उपस्थित होते.

0000000

No comments:

Post a Comment

8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव

  8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव नांदेड दि.   7   :-   सन 2019-2020 मधील मौ. सांगवी व मेळगांव परिसरातील अवैध उत्खननातून 4647.83 ब्रास जप...