Friday, September 29, 2017

आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा
- डॉ. बी. पी. कदम
नांदेड दि. 29 :-  जागतिक हृदय  दिन, आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरीक दिन पंधरवडा निमित्त जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालयात शुक्रवार 29 सप्टेंबर ते बुधवार 18 ऑक्टोंबर या कालावधीत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांनी केले आहे.  
राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक हृदय दिन साजरा करण्यात आला. यावेळी रुग्णालयातील  रुग्ण व नातेवाईक यांना हृदयरोगाबद्दल तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर यांनी उपस्थित रुग्णांना हृदयरोगाची विविध करणे सांगून हृदय रोगापासून दूर कसे राहता येईल याबाबत मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. एन. हजारी यांनी केली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलदीपक, डॉ. रहेमान, डॉ. एस. एस. राठोड, डॉ. रोशनी चव्हाण, डॉ. माया कागणे, डॉ. सभा खान, डॉ. पी. डी. बोरसे, समुपदेशक सुवर्णकार सदाशिव तसेच कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   392   23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये   ·      लोकसभा...