Monday, August 14, 2017

वंचित घटकांचे राहणीमान उंचावण्यासाठी
जिल्हा प्रशासन प्रयत्नशील - जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड, दि. 14 :- समाजातील वंचित घटकांना विविध योजनांचा लाभ देऊन त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
शोध वंचितांचा "एक संकल्प" याबाबत करावयाच्या उपाययोजनेची बैठक जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांच्या कक्षात संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) बी. एन. कांबळे, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (जि.ग्रा.वि.यं.) डॉ. पी. पी. घुले, महिला व बालविकास अधिकारी धर्मपाल शाहू, समाज कल्याण अधिकारी एस. व्ही. आऊलवार, आदी अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले की, भटक्या विमुक्त समाजातील वंचित नागरिकांना त्यांचे हक्क प्राप्त करुन देणे महत्वपुर्ण आहे. त्यांचे पुनर्वसन, आरोग्य, शिक्षण, निवारा, अन्न-धान्य, शिधापित्रका, कौशल्य विकास, व्यवसायासाठी अर्थसहाय्य यासारख्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. वंचित घटकांना लाभ मिळवून देणे एक समाजिक काम आहे. यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. मानव निर्देशांकामध्ये उल्लेखनीय प्रगती करणे या उपक्रमाचा उद्देश आहे. नांदेड जिल्ह्यात क्रमाक्रमाने हे काम पुढे नेले जाईल, असे जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी सांगितले.  
लोहा तालुक्यात वंचितांच्या वस्तीवर भेटी देऊन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदानकार्ड, तसेच स्वस्त धान्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.  या उपक्रमात नांदेड तालुक्यातील सांगवी, अर्धापुर आणि लोहा या गावांची निवड करण्यात आली आहे.  नांदेड तालुक्यातील 327 कुटुंबे, अर्धापुर तालुक्यातील 97, लोहा तालुक्यातील 96 कुटुंबांचा समावेश आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
000000



No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   401 लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान   10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार   नांदेड दि. 2 ...