Sunday, August 20, 2017

अतिवृष्‍टीच्या प्रसंगी नागरिकांनी
सावधगिरी बाळगावी ; जिल्हा प्रशासाचे आवाहन 
नांदेड दि. 20 :- विदर्भ, उत्‍तर महाराष्ट्र, कोकण, मध्‍य महाराष्ट्रासह मराठवाडयात काही ठिकाणी 24 ऑगस्ट 2017 पर्यंत अतिवृष्‍टी होण्‍याची शक्‍यता भारतीय हवामान खात्यानी दिली आहे. जिल्‍हयात नागरिकांनी पुरापासून सावधगिरी बाळगावी तसेच नदीकाठाच्‍या गावांनी सावधानता ठेवावी, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाने केले आहे.
या कालावधीत वादळी विजा कोसळण्‍याची शक्‍यता आहे. नागरीकांनी झाडाच्‍या आसऱ्याला न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा. जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे. अतिवृष्‍टीच्‍या काळात पावसाळी पाण्‍याचा येवा वाढत राहिल्‍यास अतिरिक्‍त जलसाठा विसर्ग करण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्‍यामुळे नागरीक, विद्यार्थ्यांनी पाण्‍याच्या स्‍त्रोतापासुन दुर राहावे. नदीकाठच्‍या गावांना अतिसावधतेचा इशारा देण्‍यात आला आहे. आपतकालीन प्रसंग उदभवल्‍यास नागरिकांनी सतर्क रहावे. याबाबत वेळोवेळी कुठल्‍याही प्रकारची गरज पडल्‍यास जिल्‍हा प्रशासनाच्या वरीष्‍ठ कार्यालयास त्वरीत माहिती दयावी. आपतकालीन दुरध्‍वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. जिल्‍हा पुर नियंत्रण कक्ष, सिंचन भवन, नांदेड 02462 - 263870, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नियंत्रण कक्ष 02462 - 234461, जिल्‍हा पोलिस नियंत्रण कक्ष 02462 - 234720 जिल्‍हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष 02462- 235077, फॅक्‍स 238500 टोल फ्री 1077, अग्निशमन विभाग 02462- 252555 या दुरध्वनी नंबरवर संपर्क साधावा, असेही आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाने केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   394 राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई   ·    ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन     नांदेड (जिमाका) दि. 2 9 :-   राष्...