Friday, July 21, 2017

जलयुक्त शिवार अभियान, नरेगा कामांच्या
नियोजनाकडे लक्ष द्या - जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड दि. 21 :- जलयुक्त शिवार अभियान, नरेगा, मागेल त्याला शेततळे या कामासाठी व्यवस्थित नियोजन करुन ही योजना गरजु पर्यंत पोहचवण्याचे काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.  जलयुक्त शिवार अभियान, नरेगा, मागेल त्याला शेततळे, वृक्ष लागवड या योजनांचा जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे आज आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, वन विभागाचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) बी. . कांबळे, कार्यकारी अभियंता (जलसंधारण) व्ही. पी. शाहू यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत साठलेल्या पाण्याचा पुरेपुर वापर झाला पाहिजे. यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले. सन 2017-18 मधल गावामध्ये पुढील काळात काम करण्यासाठी आतपासन नियोजन करण्याचे त्यांनी निर्देश दिले. तसेच नरेगाअंतर्गत अकरा कलमी कार्यक्रम, अहिल्यादेवी सिंचन विहि, अमृतकुंड शेततळे, फळबाग लागवड, संजवन गांडुळ खत, नाडेप वृक्ष लागवड, निर्मल शौचालय याबाबत वनविभाग, गटविकास अधिकारी यांच्याकडन आढावा घेतला.
बैठकीस जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकारी, उप विभागीय कृषि अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, आरएफओ, लागवड अधिकारी, उपकार्यकारी अभियंता, उपमुख्य कार्यकारी अभियंता (नरेगा) उपस्थित होते.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   401 लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान   10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार   नांदेड दि. 2 ...