Monday, July 17, 2017

महिला जिल्हा सल्लागार समितीची बैठक संपन्न
          नांदेड, दि. 17 :- महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्हास्तरीय सर्वसमावेशक महिला जिल्हा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षात आज संपन्न झाली.
            यावेळी कायदेविषयक मदत, पिडीत महिलांचे पुनर्वसन व सहाय्य, शुभमंगल सामुहिक विवाह योजना, कौटुंबिक हिंसाचार, हुंडा पद्धती निर्मुलनाबाबत जनजागृती, हुंडा प्रतिबंधक कायदा, अत्याचार पिडीत प्रकरणांची चौकशी, महिला कायदा, महिला धोरण, सर्वोच्च न्यायालयानी दिलेल्या निर्देशाची अंमलबजावणी तसेच महिला घटक योजनेंतर्गत राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.  
            बैठकीस तहसिलदार श्रीमती ज्योती पवार, समिती सदस्य प्रा. डॉ. निरंजन कौर, डॉ. मुजावर, श्रीमती रेखा तोरणकर, ॲड. छाया कुळकजाईकर, प्रा. पुरणशेट्टीवार, श्रीमती समता तुमनवाड, सुधा देवशेटवार, डॉ. शारदा तुंगार, समिती सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी धर्मपाल शाहू, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक अनिल कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ. अन्सारी, माविमचे जिल्हा समन्वयक जया नेमाने आदींची उपस्थिती होती. यावेळी समिती सदस्यांनी महिला विकास योजने विषयी विविध सूचना मांडल्या.
जिल्हा क्षतिसहाय्य, पुनर्वसन मंडळाची बैठक संपन्न
महिला व बाल विकास विभागांतर्गत ॲसीड हल्ला आणि लैंगीक अत्याचारात बळी पडलेल्या महिला व बालकांना अर्थसहाय्य व पुनर्वसन करण्यासाठी मनोधैर्य योजनेंतर्गत जिल्हा क्षतिसहाय्य व पुनर्वसन मंडळाची बैठक जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.  
            बैठकीत प्राप्त प्रकरणांवर योग्य ती कार्यवाहीचे प्रकरणे मंजूर करुन पिडीत महिला व बालकांना अर्थसहाय्य अनुदान मंजूर करण्यात आले. बैठकीस पोलीस उपअधीक्षक व्ही. पी. नांदेडकर, सरकारी वकील ॲड. तोरणेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अन्सारी, अशासकीय सदस्य प्रा. निरंजन कौर आदी सदस्य उपस्थित होते.
यावेळी समिती सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी धर्मपाल शाहू यांनी प्राप्त प्रकरणे जिल्हा मंडळाकडे सादर केली. शेवटी जिल्हा संरक्षण अधिकारी गणेश जोंधळे यांनी आभार मानले. 
000000


No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...