Friday, May 5, 2017

जि.प. कर्मचाऱ्यांचे बदल्यांच्या
समुपदेशनाचे वेळापत्रक जाहीर
नांदेड दि. 5 :-  जिल्हा परिषदेच्या गट क व गट ड कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदलीबाबत शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार  सार्वत्रिक बदल्या 2017 साठी जिल्हा स्तरावरील बदल्यांचे समुपदेशनाचे वेळापत्रक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांनी निश्चित केले आहे. त्यानुसार वेळापत्रकाची नांदेड जिल्हा परिषदेअंतर्गत गट क व ड मधील कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
जिल्हा परिषद सार्वत्रिक बदल्या सन 2017 चे वेळापत्रक पुढील प्रमाणे राहील. गुरुवार 11 मे 2017 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत बांधकाम विभाग. दुपारी 12 ते बदली प्रक्रिया संपेपर्यंत- आरोग्य विभाग. शुक्रवार 12 मे 2017 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत अर्थ विभाग, दुपारी 12 ते बदली प्रक्रिया संपेपर्यंत ग्रामपंचायत विभाग. शनिवार 13 मे 2017 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत महिला व बाल कल्याण विभाग, दुपारी 12 ते बदली प्रक्रिया संपेपर्यंत सामान्य प्रशासन विभाग. रविवार 14 मे 2017 रोजी सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत कृषि विभाग, दुपारी 11 ते 1 पशुसंवर्धन विभाग, दुपारी 2 ते 3 लघुपाटबंधारे विभाग, दुपारी 3 ते बदली प्रक्रिया संपेपर्यंत ग्रामीण पाणी पुरवठा विभाग. सोमवार 15 मे 2017 रोजी सकाळी 10 ते बदली प्रक्रिया संपेपर्यंत शिक्षण प्राथमिक व माध्यमिक विभाग. या सर्व समुपदेशनचे ठिकाण कै. यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड हे राहील.  या बदलीच्या वेळापत्रकात काही बदल झाल्यास तसे कळविण्यात येईल, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 409   वादळी वारे वाहण्याची ,   विजेच्या कडकडाटासह , ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता   नांदेड दि.  6  मे :-   प्रादेशिक ...