Wednesday, March 22, 2017

पोलीस भरतीसाठी वाहतूक मार्गात बदल
नांदेड दि. 22 :-  नांदेड जिल्हा पोलीस दलातील भरतीसाठी गुरुवार 23 मार्च ते 30 मार्च 2017 पर्यंत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या भरतीच्या कालावधीत शहरातील वाहतुक मार्गात बदल केल्याचे नांदेड जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.  
याबाबत प्रसिद्धीस देण्यात आले आहे की , नांदेड जिल्‍हा आस्‍थापनेवरील पोलीस भरती 2017 साठी गुरुवार 23 मार्च ते 30 मार्च 2017 कालावधीत भगतसिंग चौक ते आस्‍था आरंभ सीटी या दरम्‍यान सकाळी 5 ते सकाळी 11 वाजेपर्यंतचा मार्ग बंद / बदल करण्यात आला आहे.  
                        मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम 33 (ख) नुसार जिल्‍हा दंडाधिकारी यांना त्‍यांच्‍या क्षेत्रात लोकांच्‍या सोयीकरीता रहदारीचे विनियमन करण्‍याचा अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (ख) अन्वये प्रदान असलेल्‍या अधिकाराचा वापर करुन जिल्हादंडाधिकारी सुरेश काकाणी यांनी  नांदेड जिल्‍हा आस्‍थापनेवरील पोलीस भरती 2017 करीता गुरुवार 23 मार्च 2017 ते 30 मार्च 2017 यादरम्‍यान सकाळी 5 ते सकाळी 11 यावेळेत पुढील प्रमाणे मार्ग बंद, बदल करण्यात आला आहे.
भगवतसिंग चौकाकडून लालवाडीकडे जाणारा रोड हा भगतसिंग चौक ते आस्‍था आरंभ सिटी बंद करण्‍यात आला आहे.
लालवाडीकडून येणारी वाहतूक आस्‍था आरंभ सिटीच्‍या ठिकाणी बंद करुन त्‍या दिशेकडून येणारी वाहतूक  आस्‍था आरंभ सिटी कॉर्नर चौकाकडून शिवरत्‍न जिवाजी महाले चौकाकडे वळविण्‍यात येणार आहे.
आसर्जन नाक्‍याकडून येणारी वाहने भगतसिंग चौकाकडून लालवाडीकडे न जाता होळकर चौकाकडे तसेच धुमाळवाडीकडे वळविण्यात येणार आहे.
या कालावधीमध्‍ये पोलीस विभागाने वाहतुकीचे नियमन व नियंत्रण करावे. या आदेशाचे जो कोणी उल्‍लंघन करील तो कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील, असेही आदेशात म्हटले आहे. या वाहतुक मार्गातील बदलाची नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.                                                                                                                                                      00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   407 लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  नांदेड दि. ४ मे :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 प्र...