Thursday, December 15, 2016

महाराष्‍ट्र वैद्यकीय परिषद निवडणुकीसाठी
आयुर्वेद महाविद्यालयात तीन मतदान कक्ष
 नांदेड , दि. 15 : - महाराष्‍ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक 2016 साठी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे तीन मतदान कक्ष स्‍थापन करण्‍यात आले आहेत. निवडणुकीसाठी रविवार 18 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 8 ते सायं. 5 या कालावधीत मतदान घेण्‍यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
महाराष्‍ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक 2016 ही प्रत्‍येक जिल्‍ह्याच्‍या मुख्‍यालयी घेण्याबाबत अवर सचिव तथा नि‍वडणूक निर्णय अधिकारी महाराष्‍ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक-2016 यांनी कळविले आहे.  नऊ सदस्‍यांच्‍या या निवडणकीकरीता एकूण 49 उमेदवार आहेत. महाराष्‍ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी झालेले नांदेड जिल्‍ह्यातील एकूण 1 हजार 883 वैद्यकीय व्‍यावसायिक ( एमबीबीएस झालेले डॉक्‍टर्स) या निवडणकीचे मतदार आहेत. ही मतदार यादी प्रबंधक महाराष्‍ट्र वैद्यकीय परिषद यांचेमार्फत प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे. निवडणुकीसाठी 14 अधिकारी-कर्मचारी आणि 4 चतुर्थश्रेणी कर्मचारी तसेच प्रत्‍येक मतदान कक्षा करीता 2 पोलीस कर्मचारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   280   सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आरटीओ कार्यालय राहणार  सुरु     नांदेड दि.  27  :-  सन  2023 2024  हे वित्तीय वर्ष दिनांक  3...