Friday, December 2, 2016

नाबार्ड फायनांन्शीयलबाबत गैरसमज पसरवून
फसवणूक करणाऱ्यांपासून सावधानतेचा इशारा
नांदेड, दि. 2 :- नाबार्ड फायनांन्सीयल सर्व्हिसेस लि. ही रिझर्व बँक ऑफ इंडियाकडे नॉन बँकींग फायनांस कंपनी-सुक्ष्म वित्तपुरवठा संस्था (मायक्रो फायनांस) म्हणून नोंदणीकृत आहे. तथापी काही घटक या संस्थेबाबत गैरसमज पसरवून ग्राहक, बचत गट आदींची फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा घटकांपासून सावध राहावे, व त्याबाबत नाबार्ड फायनान्सीयल सर्व्हिसेस लि. शी संपर्क साधावा, असे आवाहन सर्व्हिसेसचे महाव्यवस्थापक ओ. पी. धोंडीयाल व सहायक महाव्यवस्थापक मनोज चलाख यांनी केले आहे.
याबाबत नाबार्ड फायनान्सीयल सर्व्हिसेसने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या सर्व्हिसेस लिमीटेडचे चे प्रवर्तक हे नाबार्ड, कर्नाटक सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील काही बँका आहेत. नाबार्ड फायनांन्सीयल सर्व्हिसेस लि. चा प्रमुख उद्देश म्हणजे स्वयंसहाय्यता बचतगटाच्या / जेएलजी ग्रुपच्या / इतर माध्यमातून ग्रामीण भागात घरपोच , वित्तीय सेवा पुरवणे हा असून त्यासाठी ज्या अशासकीय संस्था ज्या की स्वंयसहाय्यता बचतगट तयार करतात त्यांची नियुक्ती ही व्यवसाय सहाय्यक म्हणून केली जाते.
नाबार्ड फायनांन्सीयल सर्व्हिसेस लि. चा प्राथमिक उद्देश नफा कमावणे हा नसून ज्या लोकांना वित्तीय सहाय्यक मिळत नाही अशा ग्रामीण , शहरी भागातील लोकांना घरपोच वित्तीय सेवा पुरवणे व भांडवल उपलब्ध करुन देणे हा आहे. तथापि काही अशासकीय संस्था एमएफआय व नाबार्ड फायनांन्सीयल सर्व्हिसेस लि. बद्दल चुकीची माहिती पसरवत आहेत. अशा दोन अशासकीय संस्थाकडून काही स्वयं सहाय्यता बचत गटांना फसवण्यातही आले आहे व ह्या अशासकीय संस्थांनी स्वयं सहाय्यता बचत गटाकडून व त्यांच्या गरीब सभासदांकडून कर्जाचे वसुल केलेले पैसे, रक्कम फायनांन्शीयल सर्व्हिसेसच्या खात्यात जमा केलेले नाहीत. यासाठी ग्राहकांनी कर्ज हप्त्याची परतफेड केल्यानंतर संबंधित एनजीओच्या प्रतिनिधीकडून पावती घेणे बंधनकारक आहे. ज्या एनजीओनीं ग्राहकांचा गैरफायदा घेऊन, त्यांची फसवणूक केलेली आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अशी जी चुकीची गैर माहिती पसरविण्याचा प्रयत्न होत आहे त्याच्यामागे स्वंय सहाय्यता बचतगटांना / ग्रामीण गरीब सभासदांना फसवणाऱ्या एनजीओ अशासकीय संस्था आहेत.
नाबार्ड फायनांन्सीयल सर्व्हिसेस लि. रिजर्व बँक ऑफ इंडियाने एमएफआयसाठी निर्धारीत केलेल्या व्याजदारापेक्षा कमी व्याजदराने काम करते. हा व्याजदर वार्षीक 15.5 टक्के ते 16.9 टक्के असून हा उर्वरीत / बाकी राशीवर असतो व हा व्याजदर भारतात काम करणाऱ्या या क्षेत्रातील अन्य संस्था-कंपन्याच्या तुलनेत सर्वात कमी आहे. नाबार्ड फायनांन्सीयल सर्व्हिसेस लि. ही नियंत्रीत संस्था असून तिचे लेखा-परीक्षण नियमितपणे नाबार्ड, आरबीय आणि कॅग (RBI , Comptroller & Auditor General of India) यांच्याकडून केले जाते. नाबार्ड फायनांन्सीयल सर्व्हिसेस लि. रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या नियमावलींचे काटेकोर पालन करते.
ग्राहकांना आवाहन करण्यात येते की, नाबार्ड फायनांन्सीयल सर्व्हिसेस लि. च्या व्याजदर किंवा परतफेडीविषयी इत्यादी माहिती हवी असेल तर 1800 1024 205 या कॅाल सेंटरशी किंवा तक्रार निवारण अधिकारी 08026970500 यांच्याशी संपर्क साधण्यात यावा, तसेच थेट नाबार्ड फायनांन्सीयल सर्व्हिसेस लि. यांच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता,असेही नाबार्ड फायनांन्सीयल सर्व्हिसेस लि.चे सहायक महाव्यवस्थापक चलाख यांनी कळविले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र. 283

  वृत्त क्र.   283 निवडणूक खर्च निरीक्षक नांदेडमध्ये दाखल ; खर्चावर काटेकोर लक्ष ठेवण्याचे आवाहन नांदेड, दि. 28 : लोकसभा निवडणूक ही अतिशय गं...