Tuesday, October 4, 2016

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन संपन्न  
               नांदेड, दि. 4 :-  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व नांदेड ज्येष्ठ नागरीक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने नुकताच ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी सदस्य डॉ. हंसराज वैद्य, अशोक तेरकर, श्री. येवतीकर, एम. व्ही. सोनुले, श्री. रावके, डॉ. भा. दां. जोशी, पी. जी. नाईक, श्री. धानोरकर, ज्येष्ठ नागरीक संघटना सचिव सुभाष त्रिपाठी, श्री. हंम्बर्डे, के. डी. भोसकर, श्रीमती भोसकर, डॉ. सायन्ना मटमवार, किशनराव कदम, देविदास कल्याणकर, जगदीश नांदेडकर, इश्वर अम्मा, राजेशकुमार बास्तव, प्र. रा. कुरुभट्टे आदी ज्येष्ठ नागरीक उपस्थित होते.
               जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेडचे सचिव ए. आर. कुरेशी यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत सहाय्य व सल्ला, ज्येष्ठांसाठीच्या शासकीय योजना व सवलती त्याचप्रमाणे विविध कायदे विषयक माहिती देऊन आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. हंसराज वैद्य यांनी ज्येष्ठ नागरीकांच्या अडी-अडचणी, समस्या, त्यावरील उपाय यासंबंधी माहिती दिली. सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश श्री. येवतीकर, नांदेड जिल्हा वकील अभियोक्ता संघाचे उपाध्यक्ष अॅड. भेदे, अॅड. वाकोडकर, अॅड. शाहीद, श्री. तेरकर, सुभाष त्रिपाठी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अॅड. बंगाळे यांनी केले तर आभार ज्येष्ठ नागरीक संघाचे सचिव सुभाष त्रिपाठी यांनी मानले.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   392   23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये   ·      लोकसभा...