Friday, October 21, 2016

नांदेड विधान परिषद निवडणुकीसाठी
आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे
जिल्हा निवडणूक कार्यालयाचे आवाहन
नांदेड, दि. 21 :- विधानपरिषदेच्या नांदेड प्राधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता अंमलात आहे. या आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
भारत निवडणूक आयोगाने महाराष्‍ट्र विधान परिषदेमधील स्‍थानिक प्राधिकारी मतदार संघातील रिक्‍त जागाचा निवडणकीचा कार्यक्रम बुधवार 19 आक्‍टोबर रोजी जाहीर केला आहे. त्यानुसार नांदेड स्‍थानिक प्राधिकारी मतदार संघासाठी निवडणूक अधिसूचना बुधवार 26 ऑक्टोंबर 2016 रोजी काढण्यात येणार आहे. त्यानंतर नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत बुधवार 2 नोव्हेंबर. नामनिर्देशन पत्राची छाननी गुरुवार 3 नोव्हेंबर. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत शनिवार 5 नोव्हेंबर आणि निवडणुकीसाठी मतदान शनिवार 19 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 यावेळेत होईल. निवडणुकीची मतमोजणी मंगळवार 22 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरु होईल. या निवडणुकीसाठी आज शुक्रवार 21 ऑक्टोंबर रोजी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीबाबत गुरुवार 27 ऑक्टोंबर 2016 पर्यंत आक्षेप, हरकती मागविण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या निवडणुकीसाठी जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने वाहनाच्या वापरावरील प्रतिबंध, वाहनांचा गैरवापर, दौरे त्यासाठी शासकीय वाहनांचा वापर, तसेच या काळातील मद्यविक्री त्याचे वितरण, निवडणूक काळातील प्रचार, सार्वजनिक व खासगी मालमत्तांचे विरूपणास प्रतिबंध यासह आदर्श आचारसंहितेत अंतर्भूत असलेल्या अनेकविध बाबींबाबत पालन करण्याबाबत विविध राजकीय पक्ष, इच्छूक उमेदवार तसेच यंत्रणांना आवाहन करण्यात आले आहे. आचारसंहितेच्या काटेकोर पालनाबाबत विविध यंत्रणांद्वारे संनियंत्रण आणि नोंदी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या राजकीय पक्ष व त्यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीतही उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे यांनी उपस्थितांना निवडणूक कार्यक्रम व आचारसंहितेबाबत माहिती दिली. 

000000

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...