Tuesday, August 16, 2016

रास्तभाव धान्य दुकानात
ऑगस्ट साठीची तुरडाळ उपलब्ध
नांदेड दि. 16 :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील बीपीएल व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी ऑगस्ट 2016 साठीची तुरडाळ रास्त भाव धान्य दुकानात उपलब्ध झाल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी  नांदेड  यांनी कळवले आहे.  
            जिल्ह्यासाठी ऑगस्ट 2016 महिन्याकरीता 2 हजार 206 क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्त झाले आहे. तालुका निहाय उपलब्ध तुरडाळ पुढील प्रमाणे क्विंटल मध्ये : नांदेड- 204, हदगाव- 174, किनवट- 270, भोकर- 86, बिलोली- 133, देगलूर- 116, मुखेड- 260, कंधार- 167, लोहा- 158, अर्धापूर- 52, हिमायतनगर- 90, माहूर- 120, उमरी- 78, धर्माबाद- 66, नायगाव- 162, मुदखेड- 63. याची शिधापत्रिकाधारकांनी नोंद घेवून स्वस्त धान्य दुकानातून तुरडाळीची उचल करावी, असे आवाहन  जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...