योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करुन घेण्याचे आवाहन
नांदेड दि. 9 एप्रिल :- शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या सर्व स्कूलबस चालक-मालकांनी त्यांच्या वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करुन घ्यावे. तसेच वाहनाचे सर्व कागदपत्रे वैध करुन घ्यावीत असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संदिप निमसे यांनी केले.
शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कुलबस चालक-मालकांनी शालेय शैक्षणिक सत्र 2024-25 संपत आलेला आहे. नवीन शैक्षणिक वर्ष 2025-26 माहे जूनपासून सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करुन घ्यावे व वाहनाचे सर्व कागदपत्रे वैध करुन घ्यावीत. तसेच वाहन तांत्रिकदृष्टया दोषमुक्त व सुस्थितीत ठेवावे. शैक्षणिक सत्र 2025-26 सुरु झाल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे वाहन या कार्यालयाच्या तपासणी दरम्यान दोषी आढळून आल्यास त्या वाहनावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही प्रादेशिक परिवहन विभागाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment