Monday, December 4, 2017

गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन शक्य
शेतकऱ्यांना कृषि विभागाचे आवाहन
            नांदेड, दि. 4 :- जिल्ह्यात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सर्वत्र दिसुन येत आहे. गुलाबी बोंडअळीचा ज्या ठिकाणी प्रादुर्भाव झाला आहे अशा शेतकऱ्यांनी आपली तक्रार कृषी विभागाच्या "जी फार्म"मध्ये तालुका कृषि अधिकारी किंवा कृषि अधिकारी पंचायत समिती यांचेकडे सादर असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
प्राप्त तक्रारीची तपासणी जिल्हा तालुका स्तरावर सुरु असून यासंदर्भात पुढील हंगामात प्रादुर्भा कमी राहण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना घेण्याचे अवाहन कृषी विभाग कापूस संशोधन केंद्र नांदेड यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
            नांदेड जिल्ह्यामध्ये बहुतांश क्षेत्रावर बीटी कापसाची लागवड केली जाते. पुढील हंगामामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आत्तापासूनच एकात्मीक किड व्यवस्थापनाचा अवलंब करणे गरजेचे आहे. बऱ्याच क्षेत्रामध्ये थोड्या आर्थिक लाभासाठी कापूस पिकाची फरदड घेतली जाते. त्यामुळे गुलाबी बोंडअळीला  जीवनक्रम पुर्ण करण्यासाठी सततचे खाद्य मिळते. त्यामुळे पुढील हंगामात तिचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते. त्यामुळे फरदड घेता वेचणी पुर्ण झालेल्या शेतातील पऱ्हाट्या उपटून त्या नष्ट करणे गरजेचे आहे. उपटून टाकलेल्या पऱ्हाट्यांच्या नख्यांमध्ये सुध्दा शेंदरी बोंडअळी सूप्त अवस्थेत राहते. त्यामुळे अशा पऱ्हाट्या शेतात पडलेली बोंड नख्या वेचून कंपोष्ट खड्डयामध्ये गाडावे. पुढील हंगामातील कापसाच्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव कमी राहण्यासाठी कमीत कमी पाच ते सहा महिण्याचे अंतर आवश्यक आहे.  चालु हंगामातील गुलाबी बोंडअळीचे कोष जमिनीमध्ये सूप्त अवस्थेत राहात असल्यामुळे शेताची खोल नांगरट करणे गरजेचे आहे. त्यामुळे कोष पृष्ठभागावर आल्यामुळे पक्षी ते खाऊन नष्ट करतात. कापूस पिकाची वेचणी पुर्ण झाल्यानंतर उभ्या पिकात जनावरे, गुरे शेळ्या मेंढ्या चरण्यासाठी सोडावी. गुरे चरण्यास सोडण्यापुर्वी  पीकावर किमान एक महिण्यापुर्वी फवारणी झालेली नाही याची खाञी करावी. कापसातील बियाण्यास गुलाबी बोंडअळी खात असल्यामुळे जिनींग प्रेसिंग मिल परिसरात गुलाबी बोंडअळीचे कोष, पतंग इत्यादी आढळून येतात. त्यामुळे त्या ठिकाणी प्रकाश सापळे कामगंध सापळे लावणे आवश्यक आहे. जिनींग प्रेसिंग मिलमधील किडग्रस्त सरकी वेगळी करुण बाजुला काढल्या जातात. अशा सरकी जिनींग मिल व्यवस्थापनाने उघड्यावर ठेवता नष्ट करणे आवश्यक आहे.पुढील हंगामातील कापूस पिकात फुले लागण्याच्या वेळी कामगंध सापळ्यांचा वापर करणे आवश्यक आहे. चालु हंगामातील पीक काढल्यानंतर त्या पीकावर प्रादुर्भाव झालेल्या कीडींचे कोष जमिनीमध्ये सुप्तावस्थेत राहतात. पुढील हंगामात तेच पीक त्याच जमिनीवर घेतल्यासकीडींचा प्रादुर्भात मोठया प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे जमिनीवर पीकांची फेरपालट करणे नितांत आवश्यक आहे. एकाच जमिनीवर पुन:पुन्हा एकच पीक घेऊ नये. अशा प्रकारे गुलाबी बोंड अळीचे प्रतिबंधक एकात्मीक उपाययोजना अवलंबल्यास गुलाबी बोंडअळीचे नियंञण करणे करणे सोपे होईल, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   407 लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  नांदेड दि. ४ मे :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 प्र...