Monday, April 7, 2025

वृत्त क्रमांक 361

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहाचे आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उदघाटन

8 ते 14 एप्रिल या कालावधीत सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन

 

नांदेड दि. 7  एप्रिल :- सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड यांच्यावतीने 1 एप्रिल ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन उद्या 8 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते समाज कल्याण कार्यालयात होणार आहे.

 

या सामाजिक सप्ताह कार्यक्रमाअंतर्गत विभागाच्या सर्व कल्याणकारी योजनांची माहिती सर्व सामान्य जनतेला व्हावी तसेच नागरिकामध्ये जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने 8 ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताह कार्यक्रम सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय व त्यांच्या अधिनस्त नांदेड जिल्ह्यातील कार्यरत अनु. जाती मुला-मुलींचे शासकीय निवासी शाळा व मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहात सामाजिक सप्ताह कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 360

 अंगणवाडी मदतनिस मानधनी पदासाठी 24 एप्रिलपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 7  एप्रिल :- बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर या कार्यालयातील अंगणवाडी मदतनीसांचे रिक्त पदे सरळ नियुक्तीने भरण्यात येणार आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता, अटी व शर्ती याबाबत सविस्तर जाहिरात  https://nanded.gov.in संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी पात्र स्थानिक महिला उमेदवारांनी 24 एप्रिल 2025 पर्यत अर्ज करावेत, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर व्हि.एस.बोराटे यांनी केले आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर या कार्यालयातील अंगणवाडी मदतनीसांचे रिक्त पदे सरळ नियुक्तीने भरण्यात येत आहेत. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत पात्र स्थानिक रहीवासी असलेल्या महिला उमेदवारांकडून 8 ते 24 एप्रिल 2025 पर्यत विहित नमुन्यात अर्ज मागणी करण्यात येत आहे. तरी पात्र स्थानिक महिला उमेदवारांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर, हौसिंग सोसायटी, घर क्र. 114, शासकीय विश्रामगृह ते पावडेवाडी नाका रोड, गणेश नगर, नांदेड कार्यालयात अर्ज करावेत.

00000

वृत्त क्रमांक 359

 विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचा दौरा

                                                                                          

नांदेड दि. 7  एप्रिल :-  महाराष्ट्र विधानपरिषदचे सभापती हे 9 एप्रिल 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

                                                                                                                                      बुधवार 9 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता मुंबईहून नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 8.45 वा. नांदेड विमानतळ येथून खाजगी हेलिकॉप्टरने सेलू, जि. परभणीकडे प्रयाण. सायंकाळी 5.10 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. सायं. 6 वा. नांदेड विमानतळ येथून खाजगी विमानाने पुणेकडे प्रयाण करतील.

0000

वृत्त क्रमांक 358

 जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे

"समता पंधरवडा " विशेष मोहिमेचे आयोजन

नांदेड दि. 7  एप्रिल :-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे"समता पंधरवडा" आयोजित केला आहे. या पंधरवड्याच्या निमित्ताने 7 एप्रिल ते 14 एप्रिल, 2025 या कालावधीत विशेष मोहिम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या समता पंधरवड्यात विशेष मोहिमेतंर्गत जिल्हयातील इ.11 व 12 विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थी, सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपापल्या संबंधित महाविद्यालयात ऑनलाईन भरलेला परिपूर्ण अर्ज जमा करुन जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावेत. तसेच सर्व कनिष्ठ विज्ञान शाखेच्या महाविद्यालयानी देखील या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त तथा सदस्य डॉ. छाया कुं. कुलाल यांनी केले आहे.
                                                                                                                               

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला समता, स्वातंत्र्य, बंधुत्व या त्रयीने समाजामध्ये एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.  राज्यघटनेच्या कलम 46 मध्ये घटनेने समाजातील दुर्बल वंचितांबाबत राज्याची जबाबदारी अत्यंत दूरदर्शीपणाने व गांभीर्याने नमूद केली आहे.  त्याअनुषंगाने राज्यातील अनुसूचित जाती, वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय म्हणून विविध कल्याणकारी योजना राज्यभर राबविण्यात येत आहेत.  यासर्व योजनांची जनतेला माहिती व्हावी तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य यांचा प्रचार, प्रसिध्दी व्हावी, यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध"समता पंधरवडा"कार्यक्रम राबविण्याचे ठरविले आहे.


समता पंधरवडयात सन 2024-25 मधील विज्ञान शाखेतील प्रवेशित अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांसाठी विहित मुदतीत समितीमार्फत जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमे दरम्यान संपूर्ण नांदेड जिल्हयातील विज्ञान शाखेतील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांची प्रकरणे तालुका व महाविद्यालय निहाय संख्यात्मक माहिती महाविद्यालयस्तरावर स्थापन केलेल्या समान संधी केंद्राच्या माध्यमातून महाविद्यालय व तसेच जिल्हास्तरावर संकलित करण्यात येणार आहेत. 

समता पंधरवडयात सन 2024-25 मधील इ. 11 व 12 विज्ञान शाखेतील तसेच सीईटी देणारे विद्यार्थी, डिप्लोमाच्या तृतीय वर्षातील प्रवेशित ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप पावेतो जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी महाविद्यालयामार्फत जातप्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाईन अर्ज समितीकडे दाखल केलेले नाहीत, अशा सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी विशेष मोहिमेतंर्गत त्यांचे ऑनलाईन अर्ज संबंधित महाविद्यालयाच्या समान संधी केंद्रामार्फत भरुन महाविद्यालयाकडे दाखल करावेत.  त्याच बरोबर अशा सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या अडचणीच्या पार्श्वभूमीवर संबंधित महाविद्यालयातील समान संधी केंद्रामार्फत विशेष मोहिमेतंर्गत वेबिनारचे आयोजन करण्यात येणार आहे.  तसेच संबंधित महाविद्यालयाच्या समान संधी केंद्रामार्फत सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जमा करुन घेण्यात आलेले ऑनलाईन भरलेले एकत्रित अर्ज प्रवर्गनिहाय समितीकडे प्राप्त झाल्यानंतर अशा सर्व अर्जावर समितीच्यावतीने तात्काळ कार्यवाही करुन वैधता प्रमाणपत्र देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जेणेकरुन समितीचे कामकाज अधिक पारदर्शक, लोकाभिमुख व गतिमान होऊन विद्यार्थ्यांना विहीत वेळेत वैधता प्रमाणपत्र मिळू शकेल.

00000

वृत्त क्रमांक 357

 राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आज नांदेडमध्ये

                                                                                                                                                                                              नांदेड दि. 7  एप्रिल :- राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म  राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर हे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
  
सोमवार दि. 7 एप्रिल 2025 रोजी रात्री 9 वाजता हैद्राबाद येथून शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे आगमन व राखीव.
0000

Saturday, April 5, 2025

राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी आज संध्याकाळी साडेसात वाजता माहूर गडावरील रेणुका देवीचे दर्शन घेतले. माहूर येथून ते पुन्हा यवतमाळ जिल्ह्यातील पुसद या गावी रवाना झालेत.














  वृत्त क्रमांक 356

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली कृष्णा राऊतच्या शिक्षणाची जबाबदारी

 मृतांच्या कुटुंबियांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी गुंज येथे रविवारी विशेष सहायता शिबीर 

 नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथील घटनाक्रमानंतर शासनाकडून कुटुंबांचे सांत्वन 

 नांदेड व हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांकडून दुसऱ्या दिवशीही आढावा 

 नांदेड /हिंगोली, दि.५ एप्रिल: वसमत तालुक्यातील गुंज येथील शेतमजुरांना घेऊन जाणारी ट्रैक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा मुलगा कृष्णा राऊत याच्या शिक्षणाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. तर मृताच्या कुटुंबियांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून रविवारी (दि.६) गुंज येथे विशेष सहायता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

शुक्रवारच्या दुर्घटनेची दखल प्रधानमंत्री कार्यालय तसेच मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली आहे. घटनेतील कुटुंबांच्या पाठीशी शासन उभे राहिले असून आज नांदेड व हिंगोली येथील जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांमार्फत पुन्हा या घटनाक्रमाचा आढावा घेतला.

 नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथे शुक्रवारी ४ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता ही दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत वसमत तालुक्यातील गुंज त.आसेगाव येथील ९ महिला व एक पुरुष शेतमजूर आलेगाव शिवारातील शेत गट क्र.२०१ मध्ये शेती कामासाठी जात होते. सदरील शेताजवळ आले असता पाण्याने भरलेल्या विहिरीत हे शेतमजूर ट्रॅक्टरसह पडल्यामुळे त्यातील ७ महिलांचा मृत्यू झाला.

त्यातील एका मयत महिलेचा मुलगा कृष्णा तुकाराम राऊत याचा समाज माध्यमांवरील व्हिडीओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिला असता, त्यांनी व्हिडीओची तात्काळ दखल घेतली. त्या व्हिडीओमधील लहान मुलाची वेदना व भावना समजून घेत मुख्यमंत्र्यांनी कृष्णाच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वतः घेत असल्याचे जाहीर केले. तसेच मयतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लक्ष रुपयाची आर्थिक मदतही जाहीर केली आहे.

तसेच आज शनिवारी (दि.५) रोजी जिल्हाधिकारी अभिनव गोयल व नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिलेल्या निर्देशानुसार वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी यांनी मौजे गुंज त. आसेगाव येथील मयतांच्या वारस, नातेवाईकांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे सांत्वन केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचवल्या. त्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, घरकुल योजने अंतर्गत घरकुल योजनेचे लाभ, पुरवठा विभागातील शिधापत्रिका व स्वस्त धान्याबाबतचे लाभ, शिक्षणाशी संबंधित विविध प्रमाणपत्रांचे लाभ, व इतर अनुषंगीक प्राथमिक गरजा पूर्ण करणारे लाभ मिळवून देण्याबाबतची सर्व माहिती मयतांच्या वारसांना अथवा नातेवाईकांना जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिका-यांकडून देण्यात आली.

तहसीलदार श्रीमती दळवी यांच्याकडून दुर्घटनेतील मयतांच्या वारसांना शासकीय योजनेचे लाभ देण्याच्या उद्देशाने उद्या रविवार (दि.६) रोजी गुंज त. आसेगाव येथे विशेष सहाय्य योजनेच्या शिबाराचे आयोजन ही करण्यात आलेले आहे. त्यामध्ये निवासी नायब तहसीलदार वसमत, मंडळ अधिकारी, विभाग गिरगाव व ग्राम महसूल अधिकारी, पळसगाव त. माळवटा यांना आदेश देण्यात आले असल्याचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी कळविले आहे. 

***







केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...