सुधारित वृत्त
वृत्त क्रमांक 657
आणीबाणीच्या विविध घटनांच्या
छायाचित्र प्रदर्शनाचे आज उद्घाटन
नांदेड दि. 24 जून :- देशात दिनांक 25 जून 1975 रोजी आणिबाणी लागू करण्यात आली होती. या घटनेला येत्या 25 जून रोजी 50 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त विशेष छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात बुधवार 25 जून 2025 रोजी करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राहुल कर्डिले यांच्या हस्ते सकाळी 10.30 वा. या छायाचित्र माहिती प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
या प्रदर्शनात आणीबाणीच्या अनुषंगाने जिल्ह्यात घडलेल्या विविध घटना-घडामोडींची तसेच आणीबाणीविरोधी संघर्षात सहभागी झालेल्या विविध कार्यकर्ते-नागरिकांची छायाचित्रे व माहितीचा समावेश असणार आहे. या छायाचित्र माहिती प्रदर्शनास उपस्थित राहण्याचे आवाहन नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाने केले आहे.
000