Tuesday, June 24, 2025

वृत्त क्र. 655 

नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण 

नांदेड दि. 24 जून :- नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे वर्ष 2025 ते 2030 साठी आरक्षण सोडत 1 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वा. तहसिल कार्यालय नांदेड (उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या बैठक कक्षात दुसरा मजला) येथे काढण्यात येणार आहे. सरपंच पदाचे आरक्षणात नांदेड तालुक्यात एकुण राखीव 73 पदांपैकी 37 महिलांसाठी राखीव पदे आहेत. सर्व संबंधीतानी तसेच माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी या सोडतीस उपस्थित रहावे, असे आवाहन तहसिलदार नांदेड 

नांदेड जिल्हाधिकारी यांची अधिसूचना 23 जून 2025 नुसार नांदेड तालुक्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकाचा मागास प्रवर्ग आणि स्त्रिया यांच्यासाठी राखून ठेवावयाची सरपंचाची पदे मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 च्या नियम 2 अ चे पोटनियम 3 4 अन्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी पुढील तपशिलानुसार अधिसूचीत करुन दिले आहे. 

सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी एकुण राखीव पद 18 त्यापैकी 50 टक्के महिलांसाठी राखीव 9, अनुसूचित जमाती 1 पैकी महिलासाठी 1, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकुण राखीव पद 20 पैकी महिलांसाठी 10, खुला प्रवर्ग एकुण राखीव पद 34 पैकी 50 टक्के महिलांसाठी 17 राखीव ठेवण्यात आली आहेत. 

आरक्षण हे सन 2025 ते 2030 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी अमलात राहील. सदर प्रवर्गाच्या सरपंच पदासाठी सोडत पद्धतीने तहसिल कार्यालय नांदेड (उपविभागीय अधिकारी नांदेड यांचे बैठक कक्ष, दुसरा मजला) येथे मंगळवार 1 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वा. करण्यात येईल. सर्व संबंधीतानी असेही आवाहन तहसिलदार संजय वारकड यांनी केले आहे.

00000


No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...